* मनोज दांडगे यांच्या संकल्पनेतून जामठी गावामध्ये नवोपक्रम
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
जामठी-शेकापूर गट ग्रामपंचायतचे सरपंच बिलाल गायकवाड, उपसरपंच कौतिकराव नरोटे यांच्यासह ग्रा पं सदस्य यांच्या प्रयत्नांतून जामठी गावामध्ये घंटा गाडी द्वारे स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली आहे.ज्येष्ठ नागरिक सुगदेव विष्णूजी तायडे पाटील यांच्यासह सरपंच,उपसरपंच,ग्रां प सदस्य तथा उमेश दांडगे यांच्या हस्ते फीत कापून घंटा गाडीचे उद्घाटन करण्यात आले.
2 नोव्हेंबर 2022 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेल चे मनोजभाऊ दांडगे यांच्या संकल्पनेतून जामठी गावामध्ये घंटागाडी सुरू करून नवोउपक्रमाच्या माध्यमातून स्वच्छतेकडे एक पाऊल पुढे टाकण्यात आले. जामठी-शेकापूर गट ग्रामपंचायत चे सरपंच बिलाल गायकवाड उपसरपंच कौतिकराव नरोटे यांच्यासह ग्रामपंचायतचे सदस्य ग्रामसेवक व ग्रामपंचायत चे सर्व कर्मचारी यांच्या प्रयत्नातून जामठी गावामध्ये आज घंटागाडीची सुरुवात करण्यात आली. आज सकाळी जामठी गावात प्राथमिक स्वरूपात गावातील ज्येष्ठ नागरिक सुखदेव विष्णूजी तायडे पाटील यांच्यासह सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तथा उमेश भाऊ दांडगे यांच्या हस्ते हित कापून घंटागाडीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सिताराम लक्ष्मण तायडे,शालिग्राम काशिबा तायडे,रामेश्वर पाटील तायडे, जाकीर शेख (जक्का सेठ), प्रकाश मंत्री तायडे, रमेश पाटील तायडे, शेषराव पाटील, समाधान कडूबा तायडे,नामदेव म्हस्के, सुभाष तुकाराम तायडे,हर्षल पाटील तायडे, विलास पाटील तायडे, जितेंद्र तायडे,रमेश प्रकाश तायडे, सलीम खासाब, गुलाबराव तायडे, गोविंदा पवार,फकीरबा थोरात, श्रीकृष्ण तायडे, रमेश चिंचोले, तेजराव रावळकर, विनोद रावळकर, विष्णू धांडे, विनोद झगरे,नारायण कुऱ्हाडे,संदीप तायडेश्रीकृष्ण पेंटरसुखदेव अंभोरे,कृष्णा मिस्तरी,दीपक रावळकरविशाल तायडे,पगारे मामा, शबिना बी जाधव तसेच जामठी शेकापूर गट ग्रामपंचायत चे सर्व कर्मचारी वृंद व गावकरी मंडळी उपस्थित होती.
