सुश्री देवी प्रियंकाजी यांची संगीतमय रामकथा मोडणार भाविकांच्या गर्दीचा उच्चांक

सुश्री देवी प्रियंकाजी यांची संगीतमय रामकथा मोडणार भाविकांच्या गर्दीचा उच्चांक
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       सद्भावना सेवा समिती, बुलडाणाच्यावतीने भव्य संगीतमय रामकथेचे जायोजन  ७ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत सर्क्युलर रोडवरील लहाने ले आऊटच्या मैदानावर करण्यात आले असुन रामकथेच्या तयारीसाठी सद्भावना सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्यामजी चांडक यांच्या मार्गदर्शनाखालील विविध समीत्या स्थापन करण्यात आल्या आहेत. दुरदर्शन व पोस्टर्स होडीजद्वारे मोठ्या प्रमाणात जाहीरात करण्यात येत असुन रामकथेबद्दल प्रचंड उत्साह निर्माण झालेला आहे. विविध महिला मंडळे सर्व समाजातील मंडळे आणि मान्यवरांच्या सहभागामुळे शहरातील वातावरण राममय झाले आहे. ७ नोव्हेंबरला निघणाऱ्या शोभा यात्रेचे भव्य स्वागत शहरातील व्यापारी वर्ग, पतसंस्था व बँका तर्फे विशाल कमानी उभारून करण्यात येणार आहे. १ नोव्हेंबरला रामकथा मंडपाचे भुमीपुजन  आमदार संजुभाऊ गायकवाड, बुलडाणा अर्बनचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेशजी झंवर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. 9  दिवसांच्या रामकथेचा कार्यक्रम युट्युबवर लाईव्ह दाखविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ४०५०० वर्गफुटाचा मंडप, ७२० वर्गफुटाचे स्टेज आणि २० बाय १० फुटाचे स्टेजवर एल.ई.डी. स्क्रिनवर कथा दाखविण्यात येणार आहे. सुश्री देवी प्रियंकाजी यांची लोकप्रियता लक्षात घेता रामकथेला भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. व यापुर्वीचे गर्दीचे सर्व रेकॉर्डस् मोडतील अशी अपेक्षा सद्भावना सेवा समितीचे अध्यक्ष तथा बुलडाणा अर्बन परिवाराचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी व्यक्त केली आहे.
      9 दिवसाच्या रामकथेसाठी बुलडाणा अर्बन परिवार मुख्य संरक्षण आहे. पंकज उर्फ पप्पुसेठ अग्रवाल मुख्य यजमान असून रामायण पाठाचे प्रमुख यजमान अमित महाजन आहेत, रामकथेच्या 9 दिवसाचे 9 दैनिक यजमान म्हणुन अनुक्रमे नितीन जैस्वाल, अमित काळकर, श्रीराम बाबुलाल जोशी, रतनसेत नैनानी, लक्ष्मीकांत जैस्वाल, डॉ. दिपक लध्दड, शिशुपाल कुमावत, आनंद वर्मा, कैलास भडेच हे राहणार असुन दररोजचे उत्सव यजमान अनुक्रमे रामेश्वर निंभोरे, रतनलाल तापडीया, विनोद केडीया, दिपक वर्मा, शेवाळे मामा, जनार्दन राजपूत, कुमार भालचंद्र दलाल, कुमार किशोर चांडक, डोंगरखंडाळा, ललित चोपडा व रमेशसेठ पंजाबी राहणार आहेत. तसेच 9 दिवसाच्या रामायण पाठाचे यजमान अमित महाजन, विजय जायभाये, अॅड. किशोर गायकवाड, गोपाल चिरानिया, डॉ. राजेश्वर उबरहंडे, नितीन बाहेती, सौ. सोनाली अनिल गाठे, जयंत जोशी, पंजाबराव इलग, सचिन भुत, कालुरामजी कुमावत, रामनिवास यादव राहणार असून बुलडाणा अर्बन वेद विद्यालय (गुरुकुल) चे छात्र पौराहित्य करणार आहेत. रामकथेच्या 9 दिवसाच्या उत्सवात दिल्ली येथील सुप्रसिध्द झाकीवाले विविध प्रसंग व देखावे सादर करणार आहेत.  
      मंडपात प्रवेश करतांना स्मृती प्रवेशद्वारे पंकज अग्रवाल आणि रतनसेठ नैनानी द्वारा उभारण्यात येत आहे. राजश्री शाहू महाराज पतसंस्थे द्वारा भव्य स्वागत द्वार संदीपभाऊ शेळके उभारणार आहेत. रामकथेची तयार व देवी प्रियंकाजी यांची लोकप्रियता पाहता रामकथेला प्रचंड गर्दी राहणार आहे. रामकथा यशस्वी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्यासह चंपालाल शर्मा, राजेश देशलहरा, सुरेश गट्टाणी, प्रकाशचंद्र पाठक, सिध्दार्थ शर्मा, तिलोकचंद चांडक, उमेश मुंदडा, लाला माघवाणी, युवा मंडळे, महिला मंडळे व बुलडाणा अर्बन परिवार प्रयत्नशिल आहेत: