* जिल्हयातील शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
स्वाभिमानाने व निष्ठेने उभा राहिलेला राज्यभरातील शिवसैनिक हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख
मा. बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी राज्यभरातील
जनता आशिर्वादरुपी उभी आहे. युवासेना प्रमुख तथा शिवसेना नेते हे देखील राज्यभर निष्ठा यात्रेच्या माध्यमातून जनसंवाद साधत आहेत. 7 नोव्हेंबर 2022 रोजी बुलडाणा व मेहकर येथे युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या सभा व कार्यकर्ता संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सभांना जिल्हयातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांनी संयुक्तरित्या केले आहे. अकोला मार्गे आदित्य ठाकरे यांचे जिल्हयात आगमन होईल. मेहकर येथे दुपारी १ वाजता त्यांची सभा होईल. त्यानंतर बुलडाणा येथे दुपारी ३ वाजता सभेला ते मार्गदर्शन करतील. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या झंझावती दौऱ्यांनी गद्दारांच्या पायाखालची माती सरकली आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणुन कोरोना काळात केलेले महाराष्ट्र वाचविण्याचे मोलाचे काम, शेतकऱ्यांची कर्ज माफी देवून पुसलेले अश्रु हे सर्व जनता जाणून आहे. शिवसैनिक ताठ मानेने निष्ठेने पक्षासोबत आहे. आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेला उंदड प्रतिसाद मिळत आहे. मातृतिर्थ बुलडाणा जिल्हयातही 7 नोव्हेंबरला मेहकर व बुलडाणा येथे होणाऱ्या सभांना शिवसेना कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, उपजिल्हाप्रमुख संजय हाडे, सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील, छगन मेहेत्रे, भास्करराव मोरे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ.चंदाताई बढे, सौ. जिजाताई राठोड, युवासेनेचे नंदकिशोर कऱ्हाडे, शुभम पाटील यांच्यासह शिवसेना अंतर्गत सर्व संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या केले आहे.
