एनआरएचएमच्या आरोग्य सेविकांचे जिल्हा परिषद पुढे आंदोलन

एनआरएचएमच्या आरोग्य सेविकांचे जिल्हा परिषद पुढे आंदोलन


बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)

        गेल्या सतरा अठरा वर्षापासून ग्रामीण भागात आरोग्य सेवा देणाऱ्या एनआरएचएम आरोग्य सेविकांना सबळ कारण नसतांना सेवेतून कमी केले जात आहे.19 आरोग्य सेविकांना सेवा समाप्तीचा आदेश मिळाला आहे तर येत्या काही दिवसात 130 सेविकांना सेवेतून कमी केले जाणार असल्याने या विरोधात एनआरएचएम च्या आरोग्य सेविकांनी नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हा परिषदे पुढे ठिय्या आंदोलन केले. आंदोलनानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

      ज्या सेविकांना कामावरून कमी केले आहे अशा 19 आरोग्य सेविकांना तात्काळ सेवेत घेण्यात यावे व इतर राज्यात जसे एनआरएचएम कर्मचारी कायम करण्यात आले त्या धर्तीवर महाराष्ट्रातही निर्णय घ्यावा, ग्रामीण भागातील जनतेला तत्पर आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी 2006 मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू झाले. या अंतर्गत आरोग्य सेविकांची ची भरती करण्यात आली. या आरोग्य सेविकांनी ग्रामीण भागात जाऊन दखलपात्र काम केले आहे. अतिशय कमी पगारावर त्यांनी उत्कृष्ट सेवा दिली आहे. माताबाल आरोग्यगाव पातळीवर डिलेव्हरी करून शासनाच्या योजनांना तळागाळात पोचविले.कोरोना काळातही रुग्ण तपासणी व उपचारासाठी याच आरोग्यसेविका पुढे होत्या. मात्र कंत्राटी असल्याकारणाने त्यांना सेवेतून कमी करण्याचा सपाटा शासनाने लावला आहे . सेवा जेष्ठता व ग्रामीण भागातील डिलिव्हरी असा निकष लावून जिल्ह्यात 19 आरोग्य सेविकांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे तर आगामी काळात 130 आरोग्य सेविकांना सेवेतून कमी केल्या जाणार आहे .याचा निषेध करीत जिल्ह्यातील आरोग्य सेविकांनी जिल्हा परिषदेचे पुढे जमून ठिया व निषेध आंदोलन केले.यावेळी  यावेळी बहुसंख्य महिला आरोग्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.