* राज्य संघटक म्हणून सुधीर चेके पाटील यांची नियुक्ती
बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांचा बुलंद आवाज म्हणून 'व्हाईस ऑफ मीडिया' या संघटनेची ओळख आहे. पत्रकार आणि पत्रकारीतेच्या सर्वांगिन विकासासाठी आणि हितासाठी अग्रगण्य असणाऱ्या या संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी दै. 'पुण्य नगरी'चे अकोला आवृत्ती प्रमुख अनिल म्हस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राज्य संघटकपदाची जबाबदारी बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सुधीर चेके पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी सदरची नियुक्ती केली आहे.
'व्हाईस ऑफ मीडिया' ही ५० ज्येष्ठ संपादकांनी एकत्र येऊन पत्रकारिता आणि पत्रकारांच्या कल्याणासाठी निर्माण केलेली संघटना आहे. देशातील २१ राज्यांमध्ये ही संघटना कार्यरत आहे. कोरोनाच्या संकटाकाळात १३६ पत्रकारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 'व्हाईस ऑफ मीडिया'ने या १३६ पत्रकारांच्या १५० पाल्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करुन त्यांना मोठा आधार देण्याचे काम केले. त्यानंतर अपघात, मोठे आजरपण यासह इतर संकटकाळी पत्रकारांना मदत करणारी पत्रकारांची कल्याणकारी संघटना म्हणून ही संघटना देशात कार्यरत असून कोणतेही राजकारण न करता केवळ पत्रकारीता आणि पत्रकारांना सक्षम करण्याचे काम ही संघटना करीत आहे. पत्रकारांना त्यांची स्वत:ची घरे उपलब्ध करुन देणे, पत्रकारांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे, आजारपण, अपघात किंवा इतर सकटकाळी पत्रकारांना आधार देण्याचे कार्य ही संघटना करीत आहे.
या संघटनेचे विदर्भ अध्यक्ष म्हणून अनिल म्हस्के यांनी यशस्वी जबाबदारी पार पाडली. अल्पावधीतच त्यांनी संपूर्ण विदर्भात संघटन तयार केले त्यांच्या या कार्याची दखल घेत आता त्यांच्याकडे राज्य उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सुधीर चेके पाटील यांची राज्य संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 'व्हाईस ऑफ मीडिया'चे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी मुंबई येथील कार्यालयात सदर नियुक्तीची घोषणा केली असून नियुक्तीपत्र देखील संपूर्द केले आहेत. अनिल म्हस्के यांच्या अध्यक्षतेत संपूर्ण विदर्भात 'व्हाईस ऑफ मीडिया'चे प्रबळ संघटन निर्माण झाले आहे. पत्रकारांच्या कल्याणाच्या योजनांवर देखील काम सुरु झाले आहे. आता त्यांच्याकडे राज्य उपाध्यक्ष ही मोठी जबाबदारी सोपविण्यात आली असून त्यांच्या सोबतीला राज्य संघटक म्हणून सुधीर चेके पाटील हे देखील राज्यस्तरावर काम करणार आहेत. या दोघांची ही नियुक्ती म्हणजे बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असून या दोघांच्या कल्पक नेतृत्वातून जिल्ह्यातील पत्रकार आणि पत्रकारितेला चांगले दिवस येतील, यात शंका नाही. या नियुक्तीबद्दल दोघांचेही प्रसिद्धी माध्यमांसह सर्वच क्षेत्रातून कौतुक होत आहे.
