शेगाव येथून कार चोरणारे दोन आरोपी गजाआड * * एलसीबीची कारवाई
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
शेगाव शहरातील एकाची कार लंपास करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २९ ऑक्टोबर 2022 रोजी अटक केली. या टोळीकडून पथकाने चोरी गेलेली कारही जप्त केली.
शेगाव शहरातील मंगेश वसंतराव हिवाळे यांना २१ ऑक्टोबर रोजी एका अज्ञात मोबाइलवरून कॉल आला त्याने कार भाड्याने घ्यायचे सांगून चार अज्ञात लोक त्यामध्ये बसले ही कार जळगाव जामोदकडे नेण्यास सांगितले दरम्यान पातुर्डा फाटा येथे मंगेश हिवाळे यांना चहा पाजला चहा पिताच हिवाळे हे बेशुध्द झाले त्यांना जाग आली. तेव्हा ते मध्य प्रदेशमधील संग्रामपूर गावाजवळ हात-पाय बांधलेले आढले तसेच त्यांची कार (क्र. एमएच २८ व्ही ८६८६) किंमत ३ लाख ७५ हजार, मोबाइल व इतर साहित्य लंपास केले होते. याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने तपास करण्यात आला तांत्रिक पद्धतीने पोलिसांनी तपास करून अचलपूर मधील पर्सापूर येथील शंभूसिंग तुळशीरामजी विजोटे व दर्यापूरमधील बेंबळा येथील प्रवीण ऊर्फ आकाश सुखदेव कांबळे यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली तसेच चोरीची कारसुद्धा दिली या कारमध्ये आरोपींनी बरेच बदल केले होते. फिर्यादी ब गाडीमालक यांना कार दाखविली असता त्यांनी लगेच त्यांची गाडी ओळखली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सारण आवाड, अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्रवण दत्त, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित वानखेडे, विलास कुमार सानप, नापोकॉ गणेश पाटील, रवी भिसे, राजु आडवे, पोकॉ गजानन गोरले, कैलास ठोबरे यांनी केली.
