नाशिक : (डॉ. शेरूभाई मोमीन )
जिल्ह्यातील नगरपरिषद येवला येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त व भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिराजी गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त, येवला नगरपरिषद येवला चे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त व भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिराजी गांधी यांच्या स्मृतिदिना निमित्त त्रिवार वंदन करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी दोन्ही महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी महाराष्ट्र मुस्लिम महासंघ, नाशिक जिल्हा व स्वाभिमानी सेनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ. शेरूभाई मोमीन, येवला नगरपरिषदेचे अभियंता, जनार्दन फुलारी, आदित्य मुरकुटे, सदावर्ते, कासारे , झावरे, त्रिभुवन, कटारे, गायकवाड, जगताप, शिंदे, परदेशी, यांच्या सह सर्व अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
