बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
सद्भावना सेवा समिती द्वारा आयोजित दिनांक 7 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत सुश्री देवी प्रियंका जी यांच्या मधुर वाणीतून राम कथेच्या चाळीस हजार वर्ग फुटाच्या मंडपाचे भूमिपूजन बुलढाणा विधानसभा चे लोकप्रिय आमदार संजूभाऊ गायकवाड तसेच बुलढाणा अर्बनचे चीप मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेशजी झंवर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
सुश्री देवी प्रियंकाजी यांची लोकप्रियता पाहता शहरातील व परिसरातील सर्व भाविक नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून राम कथेच्या श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर सुकेशजी झंवर यांनी केले. बुलढाण्याचे लोकप्रिय आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी शक्यतो सर्व सेवा रामकथा यशस्वी होण्यासाठी देण्यात येतील, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. मोठ्या संख्येने राम कथेमध्ये तन-मन धन अर्पण करून सहकार्य करावे असे आवाहन आमदार यांनी केले स्वतः सद्भावना सेवा समितीच्या वतीने डॉ. सुकेशजी झंवर यांनी शाल व श्रीफळ देऊन आमदार संजूभाऊ गायकवाड यांचे स्वागत केले. याप्रसंगी सद्भावनाचे चंपालाल शर्मा, राजेश देशलहरा, सुरेशचंद्र गट्टानी, सिद्धार्थ शर्मा, तिलोकचंद चांडक, पंकज अग्रवाल, उमेश मुंदडा, गोपाल चिराणीया, आर्टिस्ट सिद्धभट्टी बाहेकर, तापडिया, झंवर, विजय शर्मा , पवन सोनारे , संदीप बिलारी, विजू वैद्य, प्रकाशचंद्र पाठक, प्राध्यापक गोपाल सिंग राजपूत, जी. टी. कुलकर्णी ,लालाभाई माधवानी, सुभाष दर्डा, अनिल लढ्ढा, विवेक पाठक, संजय अंबादासपंत पाठक गुरुजी आदी मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
