बुलढाण्यात प्रथमच 16 देशातील बौध्द भिक्षुंची हजेरी, मोटार सायकल रॅलीने भव्य स्वागत* आंतरराष्ट्रीय बौध्द भिक्षु संघाच्या वतीने त्रिपिठक ग्रंथाचे संगायन

बुलढाण्यात प्रथमच 16 देशातील बौध्द भिक्षुंची हजेरी, मोटार सायकल रॅलीने भव्य स्वागत
* आंतरराष्ट्रीय बौध्द भिक्षु संघाच्या वतीने त्रिपिठक ग्रंथाचे संगायन 
बुलडाणा  : (एशिया मंच वृत्त)
        विश्वशांती तसेच समस्त मानवप्राणींच्या हीताची व सुखाची मंगल कामना करण्यासाठी जेथे जेथे भगवान बुध्दांचा मंगल सहवास लाभला आहे अश्या पवित्र स्थळांवरती लाईट अॉफ बुध्दधर्मा फाऊंडेशन व इंटरनॅशनल त्रिपिठका कॉन्सीलच्या वतीने दर वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावरती भगवान बुध्दांचा उपदेशांचा संग्रह असलेल्या त्रिपिठक या ग्रंथाचे संगायन करण्यात येते.
       या निमित्ताने संपूर्ण देशात धम्म यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्ली येथून सुरवात झालेली ही धम्म यात्रा ऐलोरा अजिंठा मार्गे आज बुलडाणा येथे पोहचली.दि बुद्धिस्ट चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने या यात्रेचे बुलडाण्यात भव्य स्वागत करण्यात आले. सकाळी दहा वाजता जयस्थंभ चौकातून धम्मगिरी बुद्ध विहारापर्यंत भव्य मोटारसायकल रॅली काढून भिक्षु संघाचे धम्मगिरी येथे स्वागत करण्यात आले. धम्मगिरी महाबोधी बुध्द विहार येथे आगमन होताच त्रिपिठका चँटींग कॉन्सिलचे वरीष्ठ भंन्ते डॉ.पेराचरण महास्थविर यांचे हस्ते पंचशील ध्वजारोहन झाले. त्यानंतर त्रिपिठकाचे संगायन व धम्मदेसना घेण्यात आली. तत्पूर्वी दि बुद्धिस्ट चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माजी अप्पर जिल्हाधिकारी रमेश घेवंदे, कुणाल पैठणकर, भिकाजी मेढे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी गुलाब पुष्प देऊन भख्खू संघाचे स्वागत केले. त्रिपिठका चँटींग कॉन्सिलचे रंजन कुमार, धर्मराज हे प्रमुख अतिथी होते. भोजन अवकाशानंतर भिख्खू संघाने धम्मगिरी महाबोधी बुध्द विहाराची पाहणी करून ही धम्म यात्रा नागपूरकडे रवाना झाली. कार्यक्रमाचे नियोजन दि बुद्धिस्ट ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी रमेश घेवंदे, कुणाल पैठणकर, डि.एस.बोर्डे, प्रा.राजेश खंडेराव, अँड, राहूल दाभाडे, भिकाजी मेढे, सिध्दार्थ आराख, आत्माराम चौथमौल प्रशांत बोर्डे, मेजर साळवे, सुरेश डवरे,सुरेश सरकटे, संजय जाधव, सुरेश घेवंदे, प्रा.प्रदीप जाधव,पदमाकर डोंगरे ,प्रल्हाद कांबळे, गणेश झोटे यांनी केले होते.कार्यक्रमास शहरातील बौद्ध उपासक उपसिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 16 देशातील बौध्द भिक्षुचा समावेश
       अजिंठ्याहुन निघालेली ही धम्म यात्रा बुलढाणा, नागपुर, लखनऊ, संकीसा, श्रावस्ती, कुशीनगर, वैशाली, सारनाथ, राजगीर, बुध्दगया असा प्रवास करणार आहे. या धम्मयात्रेचे नेतृत्व अमेरीकेच्या बौध्द उपासिका वांग्मो डेक्सी या करत आहे. धम्मयात्रेत आशियातील व युरोपातील तब्बल 16 देशातील बौध्द भिक्षु यात्रा करीत आहेत. विशेष म्हणजे प्रथमच ऐलोरा, अजिंठा व बुलढाणा येथे हा भिक्षु संघ त्रिपिठक संघायनासाठी आला होता.