बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरु युवा केंद्र आणि जिजामाता महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस-एकता दौड आज 31 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलात पार पडली.
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 147 व्या जयंतीनिमित्ताने नागरिक, युवकांमध्ये देशभक्ती व राष्ट्रीय एकतेची भावना वृद्धींगत होण्यासाठी एकता दौडचे आयोजन करण्यात आले. आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांच्या हस्ते एकता दौडला हिरवी झेंडी दाखविली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, तहसिलदार रुपेश खंडारे, नगर पालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, प्राथमिक शिक्षणाधिकारी किशोर पागोरे, वीज मंडळाचे उपअभियंता बद्रीनाथ जायभाये, उपशिक्षणाधिकारी उमेश जैन, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, महासैनिक प्रशिक्षण केंद्राचे कमांडर. सुहास देशमुख, नेहरु युवा केंद्राचे लेखा व कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत उपस्थित होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी एकतेची शपथ दिली. त्यानंतर एकता दौडची सुरुवात करून जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलात समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांतर्गत चिखली तालुका क्रीडा संकुल येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया तलवारबाजी प्रशिक्षण केंद्राचे खेळाडू, महासैनिकी प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षणार्थी, जिजामाता महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनाचे विद्यार्थी, विद्यार्थीनी, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे धनुर्विद्याचे खेळाडू, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र मैदानी, कबड्डी, विविध शाळेतील विद्यार्थी, सुर्योदय योगा ग्रुप, शासकीय व निमशासकीय कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, पोलिस विभाग, खेळाडू, विविध एकविध खेळ संघटनांचे पदाधिकारी, नागरिकांनी एकता दौडमध्ये सहभाग घेतला.
रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रभाकर वारे, प्रा. डॉ. डी. जे. कांदे, प्रा. पवन ठाकरे, प्रा. डॉ. मनोज व्यवहारे, प्रा. नंदूकुमार गायकवाड, प्रा. गजेंद्रसिंह राजपूत, प्राचार्य संजीवनी शेळके, नायब तहसिंलदार श्री. डब्बे, श्रीमती जानोरकर, संदिप पाटील, विनोद शिरखंडे, वासुदेव तायडे, मन्जीतसिंग राजपूत, जीवन उबरहंडे, ईश्वर वाघ, ॲड. सुमित सरदार, विजय वानखेडे, समाधान टेकाळे, राजेश डिडोळकर, विठ्ठल इंगळे, निलेश शिंदे, अक्षय गोलांडे, शुभम सुरडकर, राजेश शेळके उपस्थित होते.
क्रीडा अधिकारी रविंद्र धारपवार यांनी सूत्रसंचालन केले. राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर, तालुका क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे, विजय बोदडे, विनोद गायकवाड, गणेश डोंगरदिवे, कृष्णा नरोटे, गोपाल गोरे, भीमराव पवार, नेहरु युवा केंद्राचे सहाय्यक धनंजय चाफेकर, विलास सोनोने, राष्ट्रीय युवा स्वयंसेवक अजय सपकाळ यांनी पुढाकार घेतला.
