दिपावली निमित्त निराधार व उपेक्षितांना फराळ व मिठाईचे वितरण* गणेश भोसले यांनी निराश्रीतांसोबत केली दिवाळी साजरी

दिपावली निमित्त निराधार व उपेक्षितांना फराळ व मिठाईचे वितरण
*  गणेश भोसले यांनी निराश्रीतांसोबत केली दिवाळी साजरी
 बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       हिंदू धर्म संस्कृतीमध्ये प्रकाशाचा सोहळा असलेल्या दिपावली सणाला फार मोठे महत्व आहे. हा सण भारतासह अन्य देशातही मोठया उत्साहात साजरा केला जातो. मात्र समाजातील अनेक निराश्रीत, निराधार व उपेक्षित जीव दिवाळी सणापासून वंचीत राहतात. अशाचं वंचीतांना आधार देण्याचे कार्य गेल्या दहा वर्षापासून मुठठे ले-आउट निवासी युवा सामाजिक कार्यकर्ता गणेश भोसले करीत आहेत. याचं अनुषंगाने यंदाही त्यांनी पुढाकार घेत समाजातील वंचीत घटकांसोबत दिवाळी साजरी करीत त्यांना फराळ व मिठाईचे वितरण करून आपले सामाजिक उत्तरदायित्व   पूर्ण  केले.
        शहरातील संगमचौक, जयस्तंभ चौक, इकबाल चौक, बसस्टँड परिसर व मलकापूर रोड परिसरातील निराधार, बेसहारांना फराळ व मिठाईचे वाटप केले. यावेळी त्यांच्या सोबत ज्ञानेश्वर सांभारे, विनोद बोंबटकर, आशिष उज्जैनकर, अमृत पंडीत, पंकज राजपुरोहित यांनी सुध्दा त्यांना या सामाजउपयोगी उपक्रमात सहकार्य केले.