बुलडाणा येथे सद्भावना सेवा समितीच्या वतीने भव्य रामकथेचे आयोजन

बुलडाणा येथे सद्भावना सेवा समितीच्या वतीने भव्य रामकथेचे आयोजन
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
        सद्भावना सेवा समिती, बुलडाणा ही सेवाभावी संस्था भावीक भक्तांसाठी विविध धार्मिक कथांचे आयोजन करीत असते. रामजन्मभुमी निर्णयामुळे वातावरण सर्वत्र राममय झालेले आहे. भाविक भक्तांचा हाच आनंद द्विगुणीत करण्यासाठी सद्भावना सेवा समिती ने भव्य संगीतमय रामकथेचे आयोजन केले असुन या कथेचा आनंद सर्व रामभक्त भाविक भक्तांनी उस्फुर्त सहभाग नोंदवून घ्यावा असे आवाहन समितीचे अध्यक्ष श्री. राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांनी केले आहे.
        सद्भावना सेवा समितीने १९९९ पासुन विविध नऊ कथांचे यशस्वीरीत्या आयोजन केले आहे. यामध्ये संत सुश्री अलकाश्रीजी, पु. कनकेश्वरीदेवी, पु. चित्रलेखाजी आदी संताच्या कथांचे व वृंदावन येथील भव्य रासलीलेचे आयोजन केले असुन यापैकी काही कथांचे दुरदर्शनवर लाईव्ह प्रसारण देखील करण्यात आले. कोरोनाचे संकट समाप्त झाल्यामुळे आणि जनतेच्या मागणीवरून यावर्षी भव्य रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. रामकथेच्या प्रवक्त्या देवी प्रियंकाजी असुन त्या उच्चविधी विभुषित आहेत. मथुरा वृंदावनमध्ये निवास आहे. मधुर आवाजाची दैवी देणगी लाभली असुन सुमधूर आवाजातुन त्यांनी रामकथा, भागवत, भजनसंध्या, संगीतमय श्रीराम चरित्र व श्रीकृष्ण चरित्र देवविदेशात पोहोचवले आहे.
       देवी प्रियंकाजी यांच्या सुमधूरवानीतुन भव्य संगीतमय श्री रामकथेचे आयोजन दि. ७ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत सद्भावना सेवा समितीने सरर्क्युलर रोडवरील लहाने ले-आऊटच्या मैदानावर करण्यात आले असुन दि. ७ ला प्रथम दिवशी पेठेतील राममंदिर येथून देवी प्रियंकाजी यांची भव्य शोभायात्रा, दिंड्या भजनी पथक, बॅण्ड, चांदीच्या पाच घोड्याचा रथ अश्व कलशधारी महिलासह शहरातील मुख्य भागातुन निघून अयोध्याधाम लहाने ले आऊट मधील कथा स्थळी पोहोचणार आहे.
       रामकथा यशस्वी करण्यासाठी परिसरातील विविध भजनी मंडळे, महिला संघटना, श्रीराम मारोती संस्थान, श्री. बालाजी संस्थान व विविध धार्मिक सामाजिक संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. या कामी समितीचे अध्यक्ष  राधेश्याम चांडक, कार्याध्यक्ष चंपालाल शर्मा, उपाध्यक्ष राजेश देशलहरा, सचिव प्रा. प्रकाशचंद्र पाठक, कोषाध्यक्ष सुरेशचंद्र गट्टाणी, सहसचिव सिध्दार्थ शर्मा, सह कोषाध्यक्ष तिलोकचंद चांडक, विजय सावजी, उमेश मुंदडा, लाला वाधवाणी, सुभाष दर्डा व युवा मंडळे आणि मुख्य संरक्षक बुलडाणा अर्बन परिवार परिश्रम घेत आहेत.