बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
चिखलीहून बुलढाण्याकडे येणाऱ्या कंटेनरने दुचाकी चालकाला धडक दिल्याची घटना आज 25 सप्टेंबर रोजी दुपारी 3.30 वाजेच्य सुमारास चिखली रोडवरील विद्युत कार्यालय जवळ घडली. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दूसरा तरुण जख्मी झाला आहे. सुमेध कराळे वय 22, रा भीमनगर, बुलढाणा असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून श्रावण गजानन हेलोडे वय 22 वर्ष हा जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
चिखलीकडून बुलढाण्याच्या दिशेने येणाऱ्या कंटेनर क्रमांक -38- 5474 ने 28 - 4055 या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात कंटेंरचा चाक दुचाकी चालकाच्या अंगावरुन गेल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. या घटनेनंतर नागरिकांची मोठी गर्दी घटनास्थळी जमली होती. त्यामुळे चिखली रोडवरील वाहतूक सुमारे अर्धा तास विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करुण उत्तरीय तपासनिसाठी प्रेत जिल्हा रुग्णालयात आणले. पुढील कारवाई पोलिस करीत आहे.