सहकारात ईश्वरीय शक्ती आहे- राध्येश्याम चांडक* बुलडाणा अर्बनची 36 वी आमसभा उत्साहात पडली पार

सहकारात ईश्वरीय शक्ती आहे- राध्येश्याम चांडक
* बुलडाणा अर्बनची 36 वी आमसभा उत्साहात  पडली पार 
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       ज्या वेळी विदर्भात सहकार या विषयी अनेकांना माहिती नव्हती, अशा काळात आम्ही बुलडाणा अर्बन नावाचे रोपटे आम्ही लावले होते. त्‍यावेळी आम्हाला प्रवाहाच्या विरोधात प्रवास करावा लागला होता. संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ व कर्मचा-यांच्या परिश्रमाने आज हे रोपटे एवढे विशाल वृक्ष बनले आहे की, श्रीलंका, नेपाल, इंडोनेशिया, पाकिस्तान, सिंगापूर आदी देशभरातील लोक संस्था बघावयास येतात. आपली प्रतिक्रिया देतांना बुलडाणा अर्बनची वाटचाल पाहुन आर्श्चय व्यक्त करीत सहकारात ईश्वरीय शक्ती असल्याचे सांगतात, असे प्रतिपादन बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राध्येश्याम चांडक यांनी केले. 
   ते, सहकार विद्या मंदिर सांस्कृतिक सभागृहात तिन हजार पाचशे सभासदाच्या उपस्थित पार पडलेल्या आमसभेत उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. यावेळी कार्यक्रमात बुलडाणा अर्बनचे उपाध्यक्ष  कांतीलाल छाजेड, चिफ मैनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर व सर्व संचालक मंडळ उपस्थित होती.
    प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष  राधेश्याम चांडक, संस्थेचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.  सुकेशजी झंवर व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते भारतमाता प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन झाल्यानंतर सहकार विद्या मंदिरच्या बँड पथकाने राष्ट्रगीत सादर करून उपस्थितीतांची मने जिंकली. त्यानंतर संस्थेच्या 36 व्या वार्षिक साधारण सभेच्या कामकाजाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सहकार विद्या मंदिराचे कैलास कोल्हे यांनी प्रार्थना सादर केले.
      प्रारंभी या आर्थिक वर्षात ,राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय किर्तीच्या सामाजिक, राजकीय, व विविध
क्षेत्रातील महनीय व्यक्ती, शास्त्रज्ञ, सैन्य व पोलिस दलातील जवान यांना यावेळी श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विषय सुचीचे वाचन रविंद्र कुलकर्णी यांनी केले. दरम्यान बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, चिफ मैनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर यांच्या शुभहस्ते संस्थेत कर्तव्य बजावतांना आपल्या प्रामाणिकपणाचा प्रत्यय देणाऱ्या सर्व 45 जनांना राम-सिता-हनुमान मुर्ती व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
       पुढे उपस्थितांना माहिती देतांना राध्येश्याम चांडक यांनी सांगितले की, बुलढाना अर्बनच्या माध्मयातून अनेक योजना राबविल्या जात आहेत. समाजाचे भले कसे होईल, शिक्षण संस्था कशा वाढविता येतील, विकास कामे कशी केली जातील, नागरिकांना धार्मिक सुविधा कशा देता येतील याचा सातत्‍याने आम्ही विचार करीत आलो आहोत. हे सर्व आम्ही सहकाराच्या मामध्यातून साधले आहे.आज बुलढाणा अर्बन ने समाजात मोठा विश्वास प्राप्त केला आहे.येत्या काळात संस्था आयोध्येत 100 खोल्यांचे भक्त निवास उभारणार आहेत.
 
सभासदामुळेच संस्थेचेनाव अंतराष्ट्रीयस्तरावर सुवर्ण अक्षरात कोरली आहे - डॉ. झंवर
        या आमसभेत बुलडाणा अर्बनचे चिफ मैनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर यांनी संस्थेच्या विकासाचा आढावा घेत संस्थेची विकासात्‍मक घोडदौडीचा आढावा घेतला. प्रथम संस्थेला 10 हजार कोटीचा पल्ला गाठला त्‍या बद्‌दल सर्व संचालक, सभासद व कर्मचा-यांचे अभिवादन केले. संस्थेच्यावतीने आशिया खंडातील अंतराष्ट्रीयस्तरावर कॉपरेटीव बैंक बैकींगचे उपाध्यक्ष पद आपणाला मिळाले. संस्थेच्या विकासाबाबत बोलतांना त्‍यांनी सांगितले की, आज रोजी संस्थेच्या 471 शाखा आहेत. गोल्ड लोन, वेअर हाउसच्या माध्यमातून संस्थेने कर्ज दिले आहे. संस्थेच्यावतीने भाजीविक्रेते व दुकानदारांना क्यूआर कोड वाटप केल्याचे सांगितले. संस्थेच्या एकूण 471 शाखा असून तेरा लाखा पेक्षा अधिक सभासद एसएमएस सुविधेचा लाभ घेत आहेत. 10 हजार पेक्षा अधिक नागरिक इंटरनेट बैंकींग व मोबाईल बैकींगचा लाभ घेत आहेत. ग्राहकांसाठी मिस कॉल बैलेन्स सुविधा सुध्दा उपलब्ध करण्यात आली आहे. आज अनेक गावांत संस्थेने वाटर एटीमची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. आपली संस्कृति आहे वेदांची हजारो वर्षापूर्वीचा आपला ठेवा आहे. ही जगातील एकमात्र संस्कृति आहे जे याचे जतन करत आहे. याच पार्श्वभूमीवर आपण वेद विद्यालय उभे केले आहे, त्‍याचे आपण निशुल्क शिक्षण देतो. उपनिषदांचे शिक्षण निशुल्क देतो या पुढील शिक्षणसाठी नाशिक किंवा वाराणसी जावे लागते असे त्‍यांनी सांगितले. येणारा काळ हा सभासदांसाठी सर्व सदस्यासाठी सर्वासाठी आशादायी असेल, उज्वल असेल असे त्‍यांनी सांगितले. 
यावेळी सभेत संस्थेचे सर्व सभासद, संचालक, हितचिंतक व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचलन गजानन धांडे यांनी केले. तर डॉ. किशोर केला यांनी आभार मानले.