* पहिल्याच दिवशी गरबा खेळणाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
पारंपरिक वेशभूषा व पोषाख परिधान करून नटलेली बालगोपाल मंडळी, युवती,महिला भगिनींची, संगीत गाण्याच्या ठेक्यावर थिरकणारी पाऊलं, 'अंबा माता कि जय' आणि गरबा खेळणाऱ्या सर्वांचाच नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दिसून आलेला. उत्स्फूर्त प्रतिसाद आशा मंगलमय उत्साहात
आणि बीसीसीएन बुलडाणा अर्बन गरबा फेस्टिवल -2022 चा सोमवार दि. 26 सप्टेंबर पासून
शानदार प्रारंभ करण्यात आला.
भारतीय संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासोबतच शहरी व ग्रामीण भागातील मुलींना महिलांना आपली गरबा दांडिया कला सादर करण्यासाठी व्यासपीठ व संधी मिळावी यासाठी बीसीसीएन बुलडाणा
अर्बन परिवाराच्या वतीने मागील वर्षापासून गरबा फेस्टिवलचे थाटात आयोजन केले जाते. यावर्षी सुध्दा खास महिला, युवती व बालगोपाल यांच्यासाठी नवरात्रोत्सवानिमित्ताने स्थानिक सहकार विद्या मंदिरच्या भव्य मैदानावर दि 26 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर या कालावधीत गरबा फेस्टिवल-2022 चे आयोजन करण्यात आले. यामध्ये बालगट, मध्यम गट व मध्यम व मोठा गट अशा तिन गटात तसेच पारंपरिक वेशभूषा व पोषाखात गरबा खेळला जाणार आहे. दरम्यान
गरबा फेस्टिवल-2022 ला सोमवारी सायंकाळी शानदार प्रारंभ झाला.
प्रारंभी बुलडाणा अर्बनचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर
डॉ सुकेशजी झंवर व गरबा फेस्टिवल आयोजन समितीच्या अध्यक्षा सौ.कोमलताई झंवर, सौ.किर्तीताई कासट यांच्या शुभहस्ते देवीची आरती करण्यात आली.विशेष म्हणजे काल पहिल्याच दिवशी गरबा
खेळणाऱ्या बालगोपाल, महिला, तरुणींचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता तर उपस्थित रसिक प्रेषक
गरबा कलावंतांना भरभरून दाद देत होते.
नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी गरबा खेळणाऱ्या सर्व कलावंतांनी तब्बल दोन अडिच तास अगदी तल्लीन होत पारंपारिक वेशभूषेत गरबा खेळून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. यावेळी गरबा आयोजन समितीच्या अध्यक्षा यावेळी मार्गदर्शक अनंताभाऊ देशपांडे यांच्यासह गरबा आयोजन समितीच्या अध्यक्षा सौ.कोमलताई झंवर, बुलडाणा अर्बनचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेशजी झंवर , सौ. किर्तीताई
कासट, काटकर ठाणेदार बुलडाणा, सौ निलिमाताई काटकर, मृणालीताई सपकाळ, सौ.किर्तीताई पऱ्हाड निलेश पाटील, सुधाकर अहेर, ऍड जितेंद्र कोठारी यांच्या शुभहस्ते उत्कृष्ट गरबा खेळणाऱ्या सर्व गटातील कलावंतांना पहिल्या दिवशीचे उत्कृष्ट व प्रोत्साहनपर असा एकुण 50 पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
या गरबा स्पर्धेचे परिक्षक म्हणून सुनयना दळवी, प्रज्ञा खिल्लारे, पुनम गावंडे व सुरेश गोरे यांनी काम पाहिले.