शेतकऱ्यांच्या सोयाबीनला दहा हजार भाव द्या* रिपब्लिकन सेनेची मागणी

शेतकऱ्यांच्या सोयाबीनला दहा हजार भाव द्या
* रिपब्लिकन सेनेची मागणी
चिखली  : (एशिया मंच वृत्त)
       शेतकऱ्यांच्या सोयाबीनला प्रती क्विंटल दहा हजार भाव मिळावा म्हणून रिपब्लीकन सेनेच्या वतीने तहसीलदार चिखली यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना दि. २६ सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयकांत गवई, बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष ब्रम्हा साळवे, जिल्हा महासचिव सलीम शेख पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांच्या सह्यानिशी निवेदन दिले.
         यावेळी रिपब्लिकन सेना तर्फे सांगण्यात आले आहे कि, कोरोना महामारी मध्ये शेतकरी हवालदिल होऊन पिंजला गेला आहे. शेतकऱ्यावर कधी आसमानी तर सुलतानी संकट चालू असतात, या संकटाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्याला सोयाबीन या पिकांना हमीभाव सरसकट किमान दहा हजार देण्यात यावा. शेतकरी राजा शेतात कष्ट करून सगळ्याचे पोट भरत होता. आज सगळ्यांचे व्यवसाय सुरळीत चालू आहे. पेट्रोल, गॅस, खाद्य पदार्थ सगळ्यांचेच भाव गगनाला भिडले आहे. शेतकऱ्याने सोयाबीन पेरली की भाव वाढतात व ऐन शेतकऱ्याची सोयाबीन काढणीला आली की, भाव गडगडतात असे कट कारस्थान करून व्यापारी व सरकार शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहे.        सोयाबीन पेरणी वेळेस ८ हजार रु. प्रती क्विंटल भाव होता परंतू आज सोयाबीन काढणीच्या वेळी ४ हजार ते ८ हजार भाव असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीन ला किमान दहा हजार प्रती क्विंटल भाव देण्यात यावा. या मागणीवर तत्काळ निर्णय घेऊन भाव जाहीर करावा अन्यथा या रिपब्लीकन सेनेच्या वतीन उग्र आंदोलन छेडण्यात येईल, कुठेही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची राहील. असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देतेवेळी चिखली ता. अध्यक्ष श्याम लहाने, शहराध्यक्ष सुनील सोळंके, शहर उपाध्यक्ष रमेश आंभोरे, युवा शहर अध्यक्ष शेख मलिक, उपाध्यक्ष सतीश पवार, उपाध्यक्ष वसीम, ऋषिकेश हिवाळे, अप्पू खान, शेख दानिश, दीपक तायडे, सौरभ बावस्कर, विकी निकाळजे, यश बावस्कर, राम बावस्कर, प्रदीप हिवाळे, विलास गवई तोरणवाडा, विश्वनाथ सपकाळ वाघापूर रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी होते.