* राज्यस्तरीय राजा शिवछत्रपती मार्शल आर्ट अजिंक्यपद स्पर्धेचे भव्य आयोजन
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता तथा राजा शिवछत्रपती मार्शल आर्ट महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ॲड. राजसाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. व राजा शिवछत्रपती मार्शल आर्ट या खेळाची या आधुनिक काळात ही महत्त्व पटवून दिले या सोबत खेळाची नियम पुस्तिका ही देण्यात आली.
या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले व पुढील महिन्यात होणाऱ्या भव्य कार्यक्रमला आवर्जुन उपस्थित राहणार व राजा शिवछत्रपती मार्शल आर्ट महाराष्ट्र राज्य संघटनेला मान्यतेसाठी सर्वपरी मदत करणार हे आश्वासन त्यांनी दिले. या प्रसंगी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष सुनील तळेकर, उपाध्यक्ष देविदास सिरसाट , सचिव सुहास राऊत यांनी दिली आहे. तसेच महाराष्ट्र राज्यसंघटनेचे सचिव मा.श्री.शिवाजीराव चव्हाण सर यांनी पुढील स्पर्धा घेण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच लवकरात लवकर मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यात पुढील महिन्यात भव्य स्वरूपात घेण्यात येणार आहे.