* गटविकास अधिकारी यांना निवेदन
मेहकर : (एशिया मंच वृत्त)
तालुक्यातील शेवटचे टोक असलेले मौजे सारशिव येथील सरपंच व उपसरपंच यांचे नाकर्तेपणामुळे गावाला पाणी पुरवठा होत नसल्याने गांवकरी मंडळी यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, मुबलक पाणी उपलब्ध असतांना गेल्या दोन वर्षापासुन गांवकरी पाण्यापासुन वंचित असल्या ने नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांनी कार्यभार सांभाळत असतांनी गावाला पाणी पुरवठा नळ योजना आहे. या योजनेच्या विहीरीत मुबलक पाणी असतांनाही थोड्या किरकोळ खर्चा अभावी हेतुपुरस्कर गांवकऱ्याची आडवणुक केल्या जात आहे. यांच्या अकार्यक्षमपणामुळे आजपर्यंत चार ग्रामसेवक ग्रामपंचायतमधुन बदली करुन गेले. त्यामुळे आजपर्यंत दोन वर्षामध्ये गावामध्ये कोणतेही विकास कामे झालेले नाही. तसेच पाणी पुरवठा योजनेच्या विहीरीला मुबलक पाणी असतांना व सदर नळयोजना सुरळीत चालु असतांना गावाला व्यवस्थित पाणी पुरवठा होत नाही. वारंवार याबाबत आपल्याकडे पाण्याच समस्येबाबत सुचना देवूनसुद्धा गांवकरी शासनाच्या विविध योजनेपासून वंचित असल्याने त्रस्त होत आहेत. ऑगस्ट महिण्याच्या ग्रामसभेमध्ये गावकऱ्यांनी पाण्याचा प्रश्न उपस्थित केला असता त्यावेळी ग्रामसेवक किरण वायाळ यांनी आठ दिवसाच्या आत पाण्याची व्यवस्था करतो असे आश्वासन दिले होते. परंतु आजपर्यंत कोणतीही कार्यवाही केली नाही. आपल्या स्तरावरुन तातडीने दोन दिवसात पाणि पुरवठा करण्यात यासाठी निवेदन देण्यात आले.
यावेळी स्वप्नील जाधव ग्रामपंचायत सदस्य सुजाता जाधव ग्रामपंचायत सदस्यसुजाता ढोणे ग्रामपंचायत सदस्य,विजय कान्हे ग्रामपंचायत सदस्य,विनोद जाधव प्रल्हाद शेजूळ, चंद्रशेखर ढोणे, पंजाबराव सवडतकर, केशव वाघ ,एकनाथ जाधव,प्रकाश राजगुरू, रवींद्र वाघ, वैभव वाघ,मनोहर वाघ, वैभव ढोणे , कन्हैया लाल मोरे आदींची उपस्थिती होती.