* हतेडी आरोग्य केंद्रावर पाचशे रूग्णांवर उपचार
बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
अंभोडा येथील सामाजिक कार्यकर्ते भूवैज्ञानिक स्व. विजय श्रीराम जवंजाळ यांचे कर्करोगाने निधन झाले. त्यांचे प्रथम पुण्यतिथी निमित्त हतेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दि. 11 रोजी मोफत उपचार आरोग्य शिबिराचे आयोजन करण् यात आले होते.
याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. वनिता रिंढे यांनी शिबिरास उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. दिप प्रज्वलन शिबिराचे आयोजक महाराष्ट्र मराठा सोयरिकचे संस्थापक सुनिल जवंजाळ, स्त्री रोगतज्ञ डॉ. मधुकर देवकर, डॉ. राम वैराळकर यांचे हस्ते झाले. यावेळी आयोजकांनी स्व. विजय जवंजाळ यांच्या पुण्यस्मरणार्थ यापुढेही शिबिराचे आयोजन दरवर्षी ठरविले असून गरजू रूग्णांना जर रक्ताची गरज पडल्यास तत्पर राहील. कॅन्सर रूग्णासाठी जी माझेकडून मदत होऊ शकेल ते करणेसाठी तत्पर राहील. असे आश्वासन शिबिरास उपस्थित रूग्णांना आयोजकांनी दिले. याप्रसंगी डॉ. शरद काळे, डॉ. कुणाल शेवाळे, डॉ. बदर, डॉ. शेळके, डॉ. गणेशराव लोखंडे, डॉ. बाहेकर, डॉ. चौथनकर, डॉ. चव्हाण यांचेसह आशा वर्कर्स परिचारीका आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सुत्र संचलन रमेशराव तायडे तर आभार भुजंगराव रिंढे पाटील यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी विठ्ठल जवंजाळ, पुरूषोत्तम जवंजाळ, प्रकाश काळवाघे, ज्ञानेश्वर पवार, गोंविदा पवार, सखाराम नरोटे, गजाननराव आडवे, अविनाश डुकरे, अरूणराव काळवाघे यांनी परिश्रम घेतले. आदिती अर्बन परिवाराचे विशेष सहकार्य लाभले.