बुलढाणा येथील सहकार विद्या मंदिर स्थित Allen करियर इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थीनीचे देदीप्यमान यश

बुलढाणा येथील सहकार विद्या मंदिर स्थित Allen करियर इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थीनीचे देदीप्यमान यश
बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
         गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणासाठी ख्याती प्राप्त  असलेल्या स्थानिक सहकार विद्या मंदिर मध्ये सुरु असलेल्या अॅलन करियर इन्स्टिट्युट मध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थीनी कु. रश्मी दिनकर पाटील हिने आय. आय. टी. इन्स्टिट्युट मध्ये प्रवेशासाठी बहुप्रतिष्ठित असणाऱ्या JEE (जेईई) च्या Advance परीक्षेमध्ये संपूर्ण भारतामधून (AIR) 5472 वा क्रमांक मिळवून देदीप्यमान यश प्राप्त केले आहे. तसेच आपला आय. आय. टी. मधील प्रवेश निश्चित केला आहे.
       तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वच स्तरातून तसेच विद्यालय प्रशासनाकडून कौतुक होत आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय बुलढाणा अर्बन परिवाराचे संस्थापक अध्यक्ष भाईजी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. सुकेशजी झंवर, बुलढाणा अर्बन व सहकार विद्या मंदिर, बुलढाणाच्या  अध्यक्षा सौ. कोमल झंवर व विद्यालय स्थित Allen सेंटरच्या सर्व शिक्षकवृंदाना दिले आहे.