सत्यजितदादा खरात यांचा भाजपमध्ये प्रवेश

सत्यजितदादा खरात यांचा भाजपमध्ये 
 प्रवेश
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
        देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याणकारी योजनांवर विश्वास ठेवून जांभोरा येथील काँग्रेसचे माजी आमदार स्व.जे.के. खरात यांचे चिरंजीव काँग्रेसचे नेते सत्यजितदादा खरात यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्रजी यादव यांच्या उपस्थितीत खामगाव येथे भाजपमध्ये प्रवेश घेतला. यांच्या सोबतच द्वारकू जावळे, विजय देशमुख, दिनकर शेवाळे, संदीप पांडुरंग खरात यांनी ही     भाजपमध्ये  प्रवेश घेतला.  यावेळी माजी मंत्री संजूभाऊ कुटे, आमदार आकाशभाऊ फुंडकर, आमदार श्वेताताई महाले,भाजपा प्रवक्ते विनोदभाऊ वाघ यांंची उपस्थिती होती.