* केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचा दावा
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
गेल्या सात वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी गरीबांच्या कल्याणासाठी विविध कल्याणकारी योजना चालविल्या. ज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, उज्वला योजना तथा हर घर जल आदींचा समावेश आहे. या कल्याणकारी योजनांमुळेच देशाची विकासात्मक भरभराट होत असल्याचा दावा केंद्रीय श्रम कामगार वन पर्यावरण व जलवायू परिवर्तन मंत्री भूपेंद्र यादव यांनी केला.
स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात 19 सप्टेबर 2022 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेला आमदार संजय कुटे, आमदार श्वेता महाले, आमदार एड आकाश फुंडकर, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार विजयराज शिंदे, माजी आमदार चैनसुख संचेती, योगेंद्र गोडे, तोताराम कायंदे, विनोद वाघ, धृपदराव सावळे आदी उपस्थित होते.
मंत्री भूपेंद्र यादव यांनी पुढे बोलतांना सांगितले की, पंतप्रधान मोदी यांनी जीएसटी सारखा कायदा आणून देशाच्या व्यापार क्षेत्रात वाढ करण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न केले. त्यांच्या नेतृत्वात भारताची जगातली अर्थव्यवस्था पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. असे ही त्यांनी सांगितले.