बुलढाणा आयडॉल स्पर्धेचा विजेता ठरला गोपाल गावंडे* रोमहर्ष ठरला अंतिम सामना

बुलढाणा आयडॉल स्पर्धेचा विजेता ठरला गोपाल गावंडे
* रोमहर्ष ठरला अंतिम सामना 
बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
         येथील बुलढाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित बुलढाणा ऑयडॉल स्पर्धेचे विजेतेपद गोपाल गावंडे यांनी पटकावले. तृप्ती डोंगरे व गोपाल गावंडे यांच्यात अटी तटीचे सादरीकरण झाले. अंतिम विजेता निवड करताना निरीक्षकांची देखील बराचवेळ विचार करावा लागला. प्रथम क्रमांक कोणाला द्यावा हा निर्णय घेताना अनेक बाबींचा विचार या ठिकाणी परीक्षकांना करावा लागला व शेवटी गोपाल गांवडे यांच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आले. तर स्पर्धेचे उपविजेतेपद तृप्ती डोंगरे यांनी पटकाविले. तृतीय क्रमांक महेंद्र रूपनारायण यांनी पटकावले.
         गणेशोत्सव सुरू होताच बुलढाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात बुलढाणा आयडॉल ही स्पर्धा ठेवण्यात आली होती. यह स्पर्धे करीता पाचही जिल्हयातून प्रचंड युवक, युवतींनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. गणेश उत्सवाच्या दहा दिवसापर्यंत विविध टप्प्यात ही स्पर्धा पार पडली. सेमी फायनल मध्ये तब्बल 19 स्पर्धक पात्र ठरले होते. या एकोणावीस स्पर्धकांना अंतिम सामन्यासाठी बुलढाणा येथील बुलढाणा अर्बन च्या ऑडिटोरियम हॉल येथे आमंत्रित करण्यात आले होते. या ठिकाणी घेण्यात आलेल्या अंतिम सामन्यात विविध फेरीत परीक्षकांनी गायकास चाळणी लावली. पहिल्या फेरीमध्ये असलेले एकोणावीस स्पर्धका पैकी दुस-या फेरीत 12 पात्र गायकांची निवड करण्यात आली. तिसऱ्या फेरीमध्ये केवळ 10 गायक उरले होते. एकूण दहा गायकांना शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या कलागुणांचा प्रदर्शन केले. दर्जेदार संगीताची साथ, गायकांचा आवाज, सादरीकरण यामुळे खचाखच भरलेल्या हॉलमध्ये एकच उत्साह दिसून आला. यावेळी गायकांनी एकापेक्षा एक सरस हिंदी गाणे मराठी गाणे भावगीत सादर करून उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या. सादरीकरण करणारा गायक हा तेवढेच ताकतीचा असल्याने रसिक वर्गात प्रचंड उत्साह दिसून आला. प्रत्येक गाण्यावर जोरदार टाळ्यांचा पाऊस या ठिकाणी होत होता. त्यामुळे आयडॉल कोणाला निवडावे अशी अडचण निर्माण झाली होती. परंतु परीक्षकांनी लावलेल्या नियम आणि चाचणीत अखेर गोपाल गावंडे यांची वर्णी लागली . तर प्रोत्साहन पर पुरस्कारासाठी तनुश्री भालेराव, प्रज्ञा धांडे, अनुराधा धोरण, अविनाश नावकर, भगवान बाभुळकर, शब्बीर बेग, स्वप्नील आराख इत्यादींना पुरस्कार वितरित करण्यात आला.             यावेळी कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, चीफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर, बुलढाणा शहर ठाणेदार काटकर, तिरुपती मंदिराचे अध्यक्ष अरुण दिवटे, पत्रकार राजेंद्र काळे, नितीन शिरसाट, राजेश दिडोळकर, रणजीत राजपूत, इसरार देशमुख, अरुण जैन, समाधान चिंचोले तसेच मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व सर्व सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चंद्रशेखर जोशी, गजानन धांडे यांनी केले. 
सांस्कृतिक कला मंदिराचा आविष्कार ठरला आकर्षणाचे केंद्र 
           सांस्कृतिक कला मंदिर अकोला येथील कलाकार तृप्ती दिनकर यांनी यावेळी नृत्य सादर करीत जोरदार टाळया मिळविल्या तर अनंत भाऊ देशपांडे यांनी गायलेले लता मंगेशकर यांचे राम लखन या चित्रपट बडा दू:ख दिया  तेरे लखनने या गाण्याने कार्यक्रमाला वेगळ्याच उंचीवर नेले. या गाण्याला रसिकाने प्रचंड टाळ्यांनी प्रतिसाद दिला. स्पर्धेच्या शेवटी देखील अनंताभाऊ देशपांडे यांच्या गाण्याची चर्चा अनेकांच्या तोंडी दिसून आली.