* पाच मुलांची एमबीबीएस साठी निवड होणार
बुलढाणा (एशिया मंच वृत्त)
शहरात राहून देखील उच्च यश गाठता येते हे शिवसाई युनिव्हर्सलने यापूर्वी देखील सिद्ध केले आहे. आपला पाल्य एमबीबीएस साठी निवडला जाणे हे बहुतांश पालकांचे स्वप्न असते यासाठी प्रयत्नांचा आटापिटा केला जातो. पहिल्याच प्रयत्नात यश मिळवणे अवघड असले तरी शिवसाई युनिव्हर्सलचे या अनुभवी शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन व विद्यार्थ्यांची मेहनत यामुळे संस्थेचे पाच विद्यार्थी एमबीबीएस साठी पात्र ठरले. यामुळे संस्थेच्या शिरपेचात पुन्हा एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. नेहा जंजाळ, अवंतिका पाटील , साक्षी पवार, अंकीत गायकी, मयुरी सोनुने या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष डी एस लहाने यांनी स्वागत केले.
17 जुलै 2022 रोजी नेशनल टेस्टिंग एजन्सी द्वारा NEET परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातून जवळपास अडीच लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये शिवसाई चे पाच विद्यार्थी चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाले. नेहा शेषराव जंजाळ 558 गुण घेऊन उत्तीर्ण झाली. अवंतिका सुहास पाटील 550 गुण, साक्षी पवार 544, अंकित गायकी 520, प्रतिक्षा आसाबे 506, मयुरी सोनुने 498 गुण घेऊन हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. या यशामागे विद्यार्थी व शिक्षक, पालक, संस्था यांची खुप मोठी मेहनत आहे. विद्यार्थ्यांची सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत कोचिंग, सायंकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत लायब्ररी व प्रत्यक्ष शिक्षक रात्री देखील हजर राहून विद्यार्थ्यांचे शंका निरसन करणे, दररोज टेस्ट घेणे त्यावर चर्चा करणे, योग्य मार्गदर्शन मिळाले तर आपल्या शहरात सुद्धा यशाला गवसणी घालता येते, हे यातून विद्यार्थ्यांनी दाखवून दिले असल्याचे डी.एस. लहाने यांनी म्हटले आहे. शिवसाई युनिव्हर्सल ज्युनिअर कॉलेजच्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवल्या बद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे स्वागत केले आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वाटचाली साठी डी. एस. लहाने यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना शिक्षक दाभाडकर, राजेश कुमार, रमाकांत दीक्षित, नीरज राजपूत, शरद दुबे, सतीश बायनाडे, रिजवान खान, रमेश कुमार व नॅशनल व बोर्ड फॅकल्टी योग्य मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई वडील, संस्था अध्यक्ष डी. एस. लहाने व शिक्षकांना दिले आहे.