सिंदखेडराजा : (एशिया मंच वृत्त)
केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालय यांच्या अंतर्गत येणाऱ्या नेहरु युवा केंद्र बुलढाणा यांच्या द्वारा स्वामी विवेकानंद जन्म आणि माँ साहेब जिजाऊ यांच्या जन्म उत्सवा निमित्य राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून युवा सप्ताहाला 12 जानेवारी रोजी प्रारंभ करण्यात आला आहे.
युवा सप्ताहाचा शुभप्रारंभ सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा स्थित स्वराज प्रशिक्षण केंद्र येथे बुलढाणा दर्पण या साप्ताहिकाचे उपसंपादक सचिन खंदारे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वामी विवेकानंद जयंती प्रसंगी युवा वर्गाला उदयोजकते विषयी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा उदयोग केंद्र बुलढाणा येथील उदयोग प्रशिक्षक अविनाश खिल्लारे सर प्रामुख्याने उपस्थित होते.
त्याचप्रमाणे युवा सप्ताहामध्ये माँ साहेब जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यासाठी कोरोना योध्या म्हणून सम्मानित झालेल्या आशा सेविका शिला प्रभाकर सोनुने, हेमलता प्रवीण जैन,सुलभा दत्तात्रय बेंदाडे उपस्थित होत्या. युवा सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी आगळी वेगळी तालुका स्तरीय रांगोळी स्पर्धा( बेटी बचाव- बेटी पढाव सुविचार वर आधारित) घेण्यात आली,यामध्ये सहभागी स्पर्धेकाने आपल्या अंगणातच रांगोळी काढून तिचा फोटो ग्रुप वर टाकायचा होता,सदर तालुका स्तरीय रांगोळी स्पर्धेत अक्षयसिंग कैलाससिंग दभैये या तरुणाने प्रथम क्रमांक पटकवला आहे, ललिता सचिन राजपूत या ताईने दूसरा क्रमांक मिळवला आहे,दरम्यान तृतीय क्रमांक मिळवण्यासाठी खूपच चुरस पाहायला मिळाली असून तिसरा क्रमांक विभागून दोन स्पर्धेकांना देण्यात आला आहे त्यामध्ये साखरखेर्डा स्थित ग्रृहिणी प्रिया रविंद्र मुदमाळी आणि शालेय विद्यार्थिनी प्रतिक्षा वसंता नाईक यांचा समावेश झाला आहे.
स्वराज प्रशिक्षण केंद्राचे संचालक मंगेश हरिभाऊ राजगुरु यांनी आपल्या गावाचा संघ तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि जिल्हास्तरावर तिसऱ्या क्रमांक घेऊन विजयी झाल्या बददल
जय बजरंग कबड्डी संघाचे सर्व खेळाडू यांना आमंत्रीत करुन मातृभुमी च्या रक्षणासाठी सद्धा कार्यरत सैनिक शुभम जगताप यांच्या हस्ते विजयी प्रमाणपत्र देऊन त्यांना सम्मानित करुन त्यांचे कौतुक केले.
तालुका स्तरिय १०० मीटर धावणे या क्रिडा स्पर्धेत मनोज कडुबा सुखदाने प्रथम क्रमांक तर किशोर सुधाकर खोटे दूसरा क्रमांक आणि पवन गजानन राजगुरु हा तिसरा क्रमांक घेऊन विजयी झाले होते त्यांचा हि सत्कार समारंभ यावेळी पार पडला.
नेहरू युवा केंद्र बुलढाणा चे सिंदखेडराजा तालुका राष्ट्रीय स्वंयमसेवक विनायक श्रीकृष्ण खरात यांनी यावेळी नेहरु युवा केंद्रामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाबद्दल माहिती देऊन युवकांनी त्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी गोपाल खरात, नागेश मंडळकर,जयदिप राजगुरु यांनी विशेष परिक्षम घेतले, दरम्यान कांचन श्रीराम निक्कम या स्वराज प्रशिक्षण केंद्राच्या विद्यार्थिनीने साकारलेली जिजामातेची भुमिका कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली.
