* तहसीलदार व तालुका आरोग्य अधिकाकऱ्यांनी न.प. मुख्याधिकाऱ्यांना दिले होते पत्र
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
तालुक्यात वाढत्या कोरोना रूग्णांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याच्या हेतूने तसेच कोरोना रूग्ण शोधण्यासाठी बुलडाणा तहसीलदार व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या पत्राच्या अनुषंगाने राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जन्मोत्सवाच्या निमित्ताने बुलडाणा शहर व परिसरात महामेगा कोविड टेस्टींग कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते.
12 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत हा कॅम्प शहरातील धाड नाका, धाड नाका दत्त मंदीर, रामनगर, महात्मा विदयालय, संगम चौक, लध्दड हॉस्पीटल, एचडीएफसी बँक आदी शहरातील सुमारे 29 ठिकाणी कॅम्प घेण्यात आले. या कॅम्प मध्ये उपकेंद्र सावळी, पीएससी चांडोळ, आरोग्य सेविका रंजना देशमुख, बुलडाणा नगरपालिका येथील शिक्षिका सईदा बी शेख यांनी सोनार गल्लीतील एचडीएफसी बँक जवळ मेगा कॅम्प लावून सेवा दिली.
