* गणेश निकम यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार भवन समिती गठीत
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
मराठी पत्रकार परिषद, मुंबईशी संलग्नीत बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत बर्दे यांची नियुक्ती कार्याध्यक्ष पदावरुन करण्यात आली आहे. अरुण जैन यांचा २ वर्षांचा कार्यकाल संपताच, परिषदेच्या संकेताप्रमाणे कार्याध्यक्षाकडे पदभार सोपविण्याची परंपरा मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे यांच्या सुचनेने पुढे चालविण्यात आली. तर १ जानेवारीला बर्दे यांनी पदभार घेतल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली व परिषदेचे उपाध्यक्षांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा पत्रकार भवन देखरेख समिती आज मंगळवार ४ जानेवारी रोजी गठीत करण्यात आली. यावेळी सर्वानुमते समितीचे अध्यक्ष म्हणून गणेश निकम यांची निवड करण्यात येवून ७ जणांची समितीही गठीत करण्यात आली.
बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाला मराठी पत्रकार परिषदेने केलेल्या सातत्यपुर्ण पाठपुराव्यामुळे शासकीय निधीतून जिल्हा पत्रकार भवन मिळाले आहे, या पत्रकार भवनाचे बांधकाम जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष विश्वंभर वाघमारे व सरचिटणीस समाधान सावळे पाटील यांच्या कारकिर्दीत झाले. त्यानंतर २००८-०९ मध्ये या बांधकामाची दुरावस्था सुधारत तेंव्हाचे अध्यक्ष अनिल म्हस्के पाटील व समितीचे राजेंद्र काळे, सुधीर चेके पाटील, अरुण जैन व रमेश उमाळकर यांच्या कारकिर्दीत पुढील काम होवून ६ जानेवारी २००९ रोजी पत्रकार भवनाचे उद्घाटन या खात्याचे तत्कालीन मंत्री ना.डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते करण्यात आले. गत ३ वर्षांपासून पत्रकार भवनाचा कार्यभार नितीन शिरसाट, राजेश डिडोळकर व गजानन धांडे यांच्या नेतृत्वात ७ सदस्सीय समिती पाहत होती. परंतु त्यांचा कार्यकाल संपल्याने व परिषदेच्या संकेताप्रमाणे सर्वांना संधी मिळावी, या उद्देशातून नव्या कार्यकारीणीचे गठण करण्यासाठी आज जिल्हा पत्रकार भवनात बैठक पार पडली.यावेळी सर्वानुमते गणेश निकम केळवदकर यांची नियुक्ती अध्यक्षपदी करण्यात आली. तर यावेळी सुखनंदन इंगळे, दिपक मोरे, सचिन लहाने, सोहम घाडगे, शौकत शहा, निलेश राऊत यांची नियुक्ती समिती सदस्य म्हणून करण्यात आली. यावेळी राजेश डिडोळकर, नितीन शिरसाट व गजानन धांडे यांच्याकडून नवनियुक्त समिती सदस्यांनी पदभार स्विकारला.
बैठकीला अरुण जैन, रणजीतसिंह राजपूत, सिध्दार्थ आराख, निलेश जोशी, वसीम शेख,जितेंद्र कायस्थ,दिनेश मुडे, बाबासाहेब जाधव, पुरुषोत्तम बोर्डे, इसरार देशमुख, भानुदास लकडे, प्रा.सुभाष लहाने, सुनिल तिजारे, प्रेम राठोड, लक्ष्मीकांत बगाडे, संदिप शुक्ला, पृथ्वीराज चव्हाण, प्रशांत खंडारे, अनिल उंबरकर, सुनिल मोरे, संदिप वानखेडे, संजय जाधव, प्रविण थोरात, नदीम शेख, नितीन कानडजे, संदीप वंत्रोले, राम हिंगे आदी उपस्थित होते.