पत्रकारितेतील अमूल्य योगदानाबददल पत्रकार पृथ्वीराज चव्हाण सम्मानित
* महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा पुढाकार
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
गेल्या पंधरा वर्षापासून विविध दैनिकांच्या माध्यमातून पत्रकारितेचे व्रत जोपासत, आपल्या परखड व निर्भिड लेखनीच्या माध्यमातून सामाजिक, राजकिय, सांस्कृतिक व शैक्षणिक असे चौफेर प्रबोधनात्मक लिखान करणारे दैनिक महानायकचे जिल्हा प्रतिनिधी पृथीराज चव्हाण यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण वृत्तपत्राच्या वर्धापण दिनानिमित्त 6 जानेवारी 2022 रोजी स्थानिक जिल्हा माहिती कार्यालयात जिल्हा महिती अधिकारी गजानन कोटुरवार यांच्या हस्ते सम्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विदर्भ उपाध्यक्ष भानुदास लकडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रा.सुभाष लहाने यांच्यासह सहायक जिल्हा महिती अधिकारी निलेश तायडे, पत्रकार भवन समितीचे नवनिर्वाचित सदस्य शौकत शाह , पत्रकार शेख आसिफ उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेचा आढावा घेतला. जिल्हाध्यक्ष प्रा. सुभाष लहाने यांनी आपल्या मनोगतातून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या समग्र पत्रकारितेचा आढावा घेवून, देशाच्या स्वातंत्रपुर्व कालखंडात प्रबोधनाचे कार्य जांभेकरांनी आपल्या पत्रकारितेतून केल्याचे सांगून, त्यांनी दिलेल्या सकारात्मक पत्रकारितेचा वारसा आजची पत्रकारांची पिढी चालवित असल्याचे ही त्यांनी सांगितले. तर पत्रकार पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या लेखनीच्या माध्यमातून विविध समस्यांना वाचा फोडून अनेकांना न्याय मिळवून दिल्याचेही ते म्हणाले. त्यांच्या सकारात्मक पत्रकारितेची दखल घेत प्रशासनाने चव्हाण यांना 2015 च्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सम्मानित केल्याचा उल्लेखही त्यांनी केला. कार्यक्रमाला जिल्हा माहिती कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.