पत्रकार भवनात नामविस्तार सोहळा कार्यक्रम संपन्न* विद्यापिठ नामांतराचा लढा हा अस्मीतेचा लढा-साहित्यीक सुरेश साबळे

पत्रकार भवनात नामविस्तार सोहळा कार्यक्रम संपन्न
* विद्यापिठ नामांतराचा लढा हा अस्मीतेचा लढा-साहित्यीक सुरेश साबळे
बुलडाणाः (एशिया मंच वृत्त)
       मराठवाडा विद्यापिठाला डॉ. बााबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे यासाठी 1977 पासून सुरू झालेला नामांंतराचा हा लढा 1994 ला संपला. या प्रदिर्घ सामाजिक लढ्यात अनेकजण शहिद झाले, अनेकांच्या संसाराची राखरागोंळी झाली तर या लढ्यातून अनेक नेतेही उदयाला आले. मात्र नंतरच्या काळात समाजाचे प्रबोधन, समाजाच्या गरजा आणि आंदोलनाच्या काळातील ज्यांनी सर्वस्व गमावले त्यांच्यासाठी जे प्रयत्न व्हायला पहिजे होते ते दुर्दैवाने झाले नाही अशी खंत साहित्यीक सुरेश साबळे यांनी व्यक्त केली. येथील पत्रकार भवनात पत्रकार संघाच्या वतीने डॉ. बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ नामविस्तार वर्धापन दिनामिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्दे यावेळी अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी साहित्यिक सुरेश साबळे यांनी नामांतर लढ्यातील आठवणी ताज्या करून देत हा लढा तमाम भारतीयांच्या अस्मीतेचा लढा होता असे सांगीतले. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमास पत्रकार भानुुदास लकडे,  संजय जाधव, सिध्दार्थ आराख, लक्ष्मीकांत बगाडे, नितिन शिरसाठ, दिपक मोरे, सुभाष लहाने, रणजीतसिंग राजपूत, गजानन धांडे, गणेश सोळंके, पुरूषोत्तम बोर्डे, वसिम शेख, नितीन कानडजे, संदिप वानखेडे, संदिप वंन्त्रोले, शौकत  शाहा, अभय जंगम, गणेश सोनुने यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.