महिला, बालकांविरूद्ध विविक्षित अपराध समितीवर आमदार श्वेताताई महाले यांची निवड

महिला, बालकांविरूद्ध विविक्षित अपराध समितीवर आमदार श्वेताताई महाले यांची निवड
चिखली : (एशिया मंच वृत्त)
      सन २०२० चे विधानसभा विधेयक क्रमांक ५२ महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालये शक्ती कायद्याखालील महिला व बालकांच्या विरुद्धच्या विविक्षित अपराधांसाठी विधेयक २०२० नुसार गठीत करण्यात आलेल्या राज्याच्या विधिमंडळ समितीवर आमदार श्वेताताई महाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
      या विधिमंडळ समितीवर समिती प्रमुख हे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील राहणार आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या विधिमंडळ सचिवालयाचे उपसचिव शिवदर्शन साठे यांच्या स्वाक्षरीचे ज्ञापन ५ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. सन २०२० चे विधानसभा विधेयक क्रमांक ५२ महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालये शक्ती कायद्याखालील महिलांच्या व बालकांच्या विरुद्धच्या विवक्षित अपराधांसाठी, लैंगिक, मानसिक अत्याचार विरोधी विधेयक, २०२० यावरील विधान मंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या २२ सदस्यांची संयुक्त समिती विधान परिषदेची सहमती घेऊन २७ डिसेंबर, २०२१ रोजी विधानसभेने गठीत करण्यात आली होती. राज्याचे गृहमंत्री हे या महिला व बालकाविरूद्धंच्या विविक्षित समितीचे प्रमुख असून गृहनिर्माण मंत्री, संसदीय कार्य मंत्री  यांच्यासह इतर विधानसभा व विधानपरिषद सदस्य हे या समितीचे सदस्य आहेत.