मॅरेथॉन स्पर्धेत सिध्दी डिडोळकर द्वितीय

मॅरेथॉन स्पर्धेत सिध्दी डिडोळकर द्वितीय
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       रोटरी क्लब खामगावचे वतीने तीन किलोमिटर खुल्या महिलांच्या गटात बुलडाणा येथील सिध्दी राजेश डिडोळकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
खामगाव शहरात रोटरी क्लब यांचे वतीने रविवार 2 जानेवारी रोजी नववर्षाच्या सुरूवातीला पुरूष व महिला यांच्या मॅरेथॉन स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. या तील किलोमिटर खुल्या महिलांच्या गटात बुलडाणा येथील सिध्दी राजेश डिडोळकर हिने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. खामगांव येथील मॅरेथॉन स्पर्धेचे यंदाचे चौथे वर्ष असून या स्पर्धेत सुमारे 1100 पुरूष व महिला स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी आयर्न मॅन दलाल, स्थानिक भाजपा आमदार अ‍ॅड.आकाश फुंडकर यांचे उपस्थितीत विजेत्या स्पर्धकांना पदक, रोख पुरस्कार व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.