बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
स्पोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया (पटियाला) द्वारा संचालित नेताजी सुभाष नॅशनल स्पोर्ट्स कोलकाता येथे ११ जानेवारी ते ३मार्च २०२३ दरम्यान संपन्न होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील अतिशय महत्त्वाच्या अशा टेबल टेनिस च्या एन. आय. एस. मध्ये स्पोर्ट कोचिंग प्रशिक्षणासाठी बुलडाणा जिल्ह्यातून केतन गीते याची निवड करण्यात आलेली आहे. टेबल टेनिस च्या एन. आय. एस. प्रशिक्षण निवड झालेला व बहुमान मिळवणारा टेबल टेनिस या खेळातील केतन गीते हा जिल्ह्यातील पहिलाच खेळाडू आहे. बंगळुरू येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय पंच प्रशिक्षणामध्ये त्याचा सहभाग होता . तसेच विजयवाडा नाशिक ठाणे आणि कोईमतुर येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील टेबल टेनिस टूर्नामेंट मध्ये पंच म्हणून अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी पार पडलेली आहे . तो जिजामाता टेबल टेनिस अकॅडमी चा खेळाडू आहे. त्याच्या या यशाबद्दल बुलडाणा जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक जयसिंग जयवार तसेच जिजामाता टेबल टेनिस अकादमीचे श्री प्राध्यापक आत्माराम राठोड तसेच संजय गायकवाड यांनी त्यांचे कौतुक केले आहे.