बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत बर्दे

बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत बर्दे 
बुलडाणा :  (एशिया मंच वृत्त)
     अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबईशी संलग्नीत असलेल्या बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते दैनिक विश्वविजेताचे संपादक
चंद्रकांत बर्दे यांची निवड करण्यात आली . बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष अरूण जैन यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आज १ जानेवारी 2022 रोजी जिल्हा पत्रकार संघाची पत्रकार भवन येथे मराठी पत्रकार परिषदेचे राज्याचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेवून मराठी पत्रकार परिषदेच्या घटने नुसार कार्यध्यक्ष हा पुढील दोन वर्षाकरीता अध्यक्ष असतो या नियमानुसार आज अध्यक्षपदासाठी चंद्रकांत बर्दे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली . त्यानंतर मावळते अध्यक्ष अरूण जैन यांनी रितसर आपल्या
अध्यक्ष पदाचा कार्यभार चंद्रकांत बर्दे यांच्याकडे सुपूर्द केला .
     यावेळी उपस्थित पत्रकारांनी नवनियुक्त अध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांचा पुष्णगुच्छ देवून टाळयांच्या गजरात स्वागत करण्यात आले . यावेळी उपस्थित पत्रकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या . यावेळी राज्याचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे , मावळते अध्यक्ष अरूण जैन , नितीन शिरसाठ ,
भानुदास लकडे , प्रा. सुभाष लहाने , राजेश डिडोळकर , संजय जाधव , सिध्दार्थ आराख , रणजितसिंग राजपूत , लक्ष्मीकांत बगाडे , अजय बिल्लारी , प्रेमकुमार राठोड , सचिन लहाने ,पृथ्वीराज चव्हाण, रविंद्र गणेशे, निलेश जोशी,  सुखनंदन इंगळे, जितेंद्र कायस्थ , युवराज वाघ , संदिप चव्हाण , सुनिल तिजारे, दिनेश मुडे , साबीर अली वैभव मोहिते , गजानन धांडे , शौकत शाह  , संदिप वानखेडे , संदिप शुक्ला , पुरूषोत्तम बोर्डे , बाबासाहेब जाधव , वसिम शेख , सुनिल मोरे , निलेश राउत ,मयुर निकम  , प्रविण थोरात,  संजय काळे , दिपक मोरे , संदिप वंत्रोले , नितिन कानडजे पाटील , शे . नदिम , आदेश कांडेलकर , आसिफ शेख , शे . इद्रीस  , राहुल डिडोळकर यांच्यासह शहरातील असंख्य पञकार उपस्थित होते.