कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आणखी निर्बंध लागू* लग्न समारंभात 50 जणांच्या उपस्थितीला परवानगी

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आणखी निर्बंध लागू
* लग्न समारंभात 50 जणांच्या उपस्थितीला परवानगी
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
      कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 लागू करण्यात आला आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा अन्वये जिल्हादंडाधिकारी एस. रामामूर्ती यांनी निर्बंधाचे आदेश जारी केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात लग्न समारंभात बंदीस्त जागांमध्ये किंवा खुल्या जागेत जास्तीत जास्त 50 व्यक्तींना परवानगी असणार आहे. इतर सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रम, मेळावा व मोठ्या प्रमाणात गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांना 50 व्यक्तींच्या उपस्थिती असणार आहे. अंत्यसंस्कार विधीमध्ये जास्तीत जास्त 20 व्यक्ती उपस्थिती असतील. पर्यटन स्थळे, मोकळी मैदाने व लोकांच्या मोठ्या गर्दीला आकर्षित करणारी इतर स्थळे या सर्व ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहीता 1973 चे कलम 144 लागू असणार आहे.  
      जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधाचे पालन होत आहे किंवा नाही, याची जबाबदारी संयुक्तिकरीत्या पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, 1860 145) ये कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व फौजदारी प्रक्रीया संहिता, 1973 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील.