राष्ट्रवादी काँग्रेसचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबनाबाबत निषेध* छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना अतिशय वेदनादायी : पूनमताई राठोड* रक्ताने लिहिलेला इतिहास असा मूठभर शाहीने पुसला जाणार नाही : मनोज दांडगे

राष्ट्रवादी काँग्रेसचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबनाबाबत  निषेध
* छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना अतिशय वेदनादायी : पूनमताई राठोड
* रक्ताने लिहिलेला इतिहास असा मूठभर शाहीने पुसला जाणार नाही : मनोज दांडगे
बुलडाणा :(एशिया मंच वृत्त)
      कर्नाटकची राजधानी बंगळूरु येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणारी घटना नुकतीच घडली आहे.या घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून या घटनेचा  मनोजभाऊ दांडगे यांच्या सह मासरूळ व धाड जिल्हा परिषद सर्कल मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने जाहीर निषेध धाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात  20 डिसेंबर रोजी पुतळ्याचे दुग्धाभिषेक व पूजन करून करण्यात  निषेध व्यक्त करण्यात आला.
  यावेळी निषेध नोंदविताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेल बुलडाणा  मनोज  दांडगे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की,  छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कठोर कार्यवाही करावी व पुन्हा असे कृत्य कुणी करणार नाही अश्या पद्धतीची कार्यवाही करण्यात यावी  तसेच रक्ताने लिहिलेला इतिहास असा मूठभर शाहीने पुसला जाणार नाही असेही मनोज दांडगे यांनी आपल्या मनोगतात विचार व्यक्त केले.तर पुनमताई राठोड सभापती समाजकल्याण यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना ही एक अतिशय वेदनादायी आहे.
  यावेळी बुलडाणा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेल मनोजभाऊ दांडगे, पुनमताई राठोड सभापती समाजकल्याण, धाड सरपंच सत्यभामा बोर्डे ताई, राष्ट्रवादी काँग्रेस बुलडाणा जिल्हा सरचिटणीस नसीम सेठ, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच सातगाव निलेशभाऊ देठे, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस विजुभाऊ धंदर, राष्ट्रवादी काँग्रेस चिखली विधानसभा उपाध्यक्ष गणेश  नरवाडे, राष्ट्रवादी युवा नेते उमेश  दांडगे, राष्ट्रवादी जेष्ठ नेते कदिर सेठ, हब्बू सेठ, तय्यब खा साब, राष्ट्रवादी काँग्रेस जेष्ठ नेते रामसिंगजी पडोळ,राष्ट्रवादी काँग्रेस चिखली विधानसभा सरचिटणीस रामेश्वर पाटील, राष्ट्रवादी नेते संतोष राऊत, राष्ट्रवादी महिला तालुका कार्याध्यक्षा निर्मलाताई तायडे, प्रदीप घुसलकर उपसरपंच सातगाव, राष्ट्रवादी नेते सुभाष  शिंदे, आकाश तायडे, दानिश खान, जाकीर भाई, शंकर अपार ,कृष्णा पेंटर, विनोद रावळकर, बाळासाहेब तायडे,सुनील शिवणकर, नितीन ठेंग,विनोद गायकी, पिंपळे , दत्तू  आघाव, कडुबा  आघाव, आसिफ सेठ, डिगु नाना जाधव,संतोष राव पाटील यांच्यासह धाड व मासरूळ जिल्हा परिषद सर्कलमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.