बुलडाण्याच्या पाच धावपटूंची द.आफ्रिका मॅरेथॉनसाठी निवड

बुलडाण्याच्या पाच धावपटूंची द.आफ्रिका मॅरेथॉनसाठी निवड
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
     हैद्राबाद येथे झालेल्या एअरटेल मॅरेथॉनमध्ये बुलडाणा येथील पाच धावपटूंनी 42 किमी अंतर वेळेत पूर्ण केल्याने त्यांची दक्षिण आफ्रिका येथे होणार्‍या मॅरेथॉन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
     हैद्राबाद येथे झालेल्या एअरटेल मॅरेथॉनमध्ये बुलडाणा येथील ज्ञानगंगा फॉरेस्ट रन ग्रुपचे अ‍ॅड.शरद राखोंडे, डॉ.विजय वाघ, संदीप शेळके, पांडुरंग नाफडे व किरण तायडे हे सहभागी झाले होते. त्यांनी 42 किमी मॅरेथॉन स्पर्धा 4 तास 25 मिनिटात पूर्ण करून चमकदार कामगिरी केली आहे. ही स्पर्धा 4 तास 25 मी.चे आत पूर्ण केल्याने या पाचही स्पर्धकांचे दक्षिण आफ्रिकेत होणार्‍या 87 किमी कॉम्रेड मॅरेथॉन साठी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल ज्ञानगंगा फॉरेस्ट रनर्स 
ग्रुपच्या  सदस्यांनी अभिनंदन केले आहे.