कोलवड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून कर्नाटकचे मुख्यमंत्री यांचा केला जाहीर निषेध

कोलवड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून कर्नाटकचे मुख्यमंत्री यांचा केला जाहीर निषेध 
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
    कर्नाटक राज्यातील बंगळूर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाली. कर्नाटक भाजपचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ह्या घटनेबद्दल आक्षेपार्ह विधान करून जनतेच्या व तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत . याचा निषेध म्हणून बुलडाणा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. डी एस लहाने यांच्या नेतृत्वात 19 डिसेंबर रोजी कोलवड येथे  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या विरोधात घोषणाबाजी करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच विटंबना करण्याऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा. डी एस लहाने यांनी केली. यावेळी अरुण पाटील, तेजराव पाटील, किरण पाटील, राजू जाधव, सिद्धेश्वर पाटील, रवी पाटील, दिनकर पाण्डे, संजय गायकवाड, एड प्रकाश गायकवाड, विष्णू सोनवणे, भरत पाटील, गोपाल माळोदे, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.