संध्या नारखेडे यांना पीएचडी पदवी प्राप्त

संध्या  नारखेडे यांना  पीएचडी पदवी प्राप्त
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
     मलकापुर तालुक्यातील शेलगाव बाजार  येथील सुभाष मुकुंद खर्चे यांची कन्या संध्या संजय नारखेडे यांना कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे. त्यांनी अँग्रीकल्चर भुगोल विषयांतर्गत  जिओग्राफीकल ॲनलिसीसी ऑफ फलोराकल्चर इन पुणे डिस्ट्रीक्ट यावर संशोधन केले होते. त्यांना किसान कॉलेज  पारोळा येथील प्राचार्य डॉ.वाय.व्ही.पाटील यांचे व डॉ.राम खर्चे राहणार तळणी यांचे मार्गदर्शन लाभले. संध्या नारखेडे या महाराष्ट्र कृषी पणन मंडळ पुणे येथे कार्यरत आहेत.