अ‍ॅड. दिलीप एडतकर यांची काँग्रेसच्या प्रवक्‍तेपदी नियुक्‍ती

अ‍ॅड. दिलीप एडतकर यांची काँग्रेसच्या प्रवक्‍तेपदी नियुक्‍ती
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
     महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाच्या 8 नव्या प्रवक्त्यांची नियुक्‍ती करुन त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. दैनिक विदर्भ मतदारचे संपादक व प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अ‍ॅड. दिलीप एडतकर यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह आमदार प्रणिती शिंदे, भावना जैन, निजामुद्दीन राईन, गोपाळ तिवारी, डॉ. सुधीर ढोणे, चारुलता टोकस, हेमलता पाटील आणि भरत सुरेश सिंह यांचीही प्रवक्तेपदी वर्णी लागली आहे.
    मीडिया पॅनलिस्ट काँग्रेस कमिटीचे प्रदेश पदाधिकारी कपिल ढोके, बालाजी गाडे व शमिना शेख यांची मीडिया पॅनलिस्ट म्हणून नियुक्ती करण्यात आली असून या नियुक्‍ती संदर्भातील पत्र काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी जारी केले आहे.