* श्री मुंगसाजी महाराज सहकारी सुतगिरणीच्या आमसभेत सरपंच, उपसरपंचाचा गौरव
चिखली : (एशिया मंच वृत्त)
संपुर्ण आयुष्य खर्ची घालुन सहकाराची चळवळ उभी करावी लागते, तेव्हा चांगल्या संस्था उभ्या राहतात आणी त्या संस्थानच्या सहकार चळवळीतुन परीसराचा विकास होतो. त्याचा फायदा परीसरातील नागरीकांना होतो. सहकारात टिका करण्यापेक्षा सहकार चळवळीमध्ये कार्य करणाऱ्या इतरांना मदत केली पाहीजे, पायात पाय अडकवून परीसरात विकास होत नाही. तक्रारी करण्यात वेळ घालविण्यापेक्षा सहकारातुन स्वतःच्या संस्था उभ्या केल्या पाहीजे. सुतगिरणी उभारणी करीता लोखो रूपये शासनाकडुन मिळाले असली तरी, अनेक सुतगिरण्यांची उभारणी तर सोडा साधी विट देखील लावण्यात आली नसल्याचे वास्तववादी प्रतिपादन माजी आमदार तथा श्री मुंगसाजी महाराज सहकारी सुतगिरणीचे अध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे यांनी 21 डिसेंबर रोजी केले. चिखली येथील श्री मुंगसाजी महाराज सहकारी सुतगिरणीच्या 30 व्या आमसभे निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सरपंच, उपसरपंच मंडळीच्या सत्कार प्रसंगी ते पुढे म्हणाले की, कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी 30 वर्षा आधी चिखलीत सहकाराचं रोपटं लावलं आज रोपटयाचा वटवृक्ष झाला आहे. राज्यातल्या सुस्थितीत असलेल्या 3 सुतगिरण्यांमध्ये चिखलीची श्री मुंगसाजी महाराज सहकारी सुतगिरणी असल्याचा मनापासुन आनंद होत आहे. त्याकाळी प्रत्यक्ष सरकारी भागभांडवल मिळाले नसतांना स्वतःच्या हिमंतीवर कर्ज घेवुन ही सुतगिरणी कर्मयोगी तात्यासाहेबांनी उभी केली असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
येथील अनुराधा नगरीच्या परीसरातील श्री मुंगसाजी महाराज संस्थान येथे सुतगिरणीची 30 वी आमसभा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रम प्रसंगी तालुक्यातील सरपंच व उपसरपंचाच्या सत्काराचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित सुतगिरणीचे भागधारक व तालुक्याभरातुन आलेेले सरपंच व उपसरपंच तथा माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे समर्थकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलतांना राहुलभाउ बोंद्रे म्हणाले की, ही सुतगिरणी उभी करतांना प्रत्यक्ष सरकारी भागभांडवल मिळाले नसतांनाही, कर्मयोगी तात्यााहेब बोंद्रे यांनी स्वतः च्या हिमंतीवर कर्ज घेवुन सुतगिरणीची उभारणी केली. आणी उभारणीच्या एका वर्षात उत्पादनास सुरूवात केेली. प्रचंड मेहनतीने सहकारी संस्था उभ्या कराव्या लागतात, टिका करणाऱ्याना त्याची काय माहिती ? असा प्रतिपादन उपस्थित सहकार टिका करण्यापेक्षा सहकार्य केले पाहीजे, ते जमत नसेल तर स्वतःच्या संस्था उभ्या करून दाखवा, सरकारी निधी केवळ अडकवुन ठेवुन नका, असा टोलाही याप्रसंगी त्यंानी लगावला. तर संस्थांवर टिका व आरोप करणा-यांना चिमटा घेत ते पुढे म्हणाले की, ज्यांना सुतगिरणी उभारणी करीता कोटयावधी रूपये मिळाले परंतु त्यांनी सुतगिरण्यांची उभारणी तर सोडा साधी विट देखील लावण्यात आली नसल्याचे सांगित ‘‘ काटयांना फक्त टोचनं माहित असते हा त्यांचा दोष नाही, म्हणुनच माझा त्यांच्यावर रोष नाही ’’ तर तालुकाभरातुन आलेल्या सरपंच, उपसरपंच यांच्या गणुगौरव प्रसंगी ते म्हणाले की, सरपंच व उपसरपंच ही ग्रामविकासाच्या रथाची चाक आहेत, आज या मंडळीचा सत्कार करीत असतांना महाविकास सरकारडुन मिळेल तो विकास निधी आणी योजना गावांपर्यंत आनण्यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्टा करेल मात्र त्यात कुठलेही राजकारण करणार नाही, असेही राहुलभाउ बोंद्रे यंानी सांगितले. यावेळी दिपक देषमाने, संजय गाडेकर, श्रीराम झोरे, पांडुरंग तायडे, विष्णु पाटील कुळसुंदर, अशोकराव पडघान यांचीही समयोचित भाषणे झाली.
कार्यक्रमासाठी रामदासभाउ भोंडे, डाॅ. विश्वनाथ यादव, समाधान सुपेकर, नंदुभाउ शिंदे , कुणाल बोंद्रे, जिल्हा परिषद सदस्या डाॅ.सौ. ज्योतीताई खेडेकर, रिजवान सोैदागर, नंदुभाउ सवडतकर, प्रकाश निकाळजे, डाॅ. प्रकाश शिंगणे, डाॅ. संतोष वानखेडे, डाॅ.सत्येंद्र भुसारी, भगवानराव काळे, पळसकर नाना, डाॅ. मोहमंद इसरार, रफिकसेठ, गोपाल देव्हडे, राउफभाई, दिपक थोरात, विश्वासराव खंडागळे, नाजिम खासाब, डाॅ. संजय घुगे, संचालक दिपक हाके, नंदु शिंदे , जगन्नाथ उंबरकर, नासेर सौदागर, चांॅद मुजावर, सि.मा. ठेंग, सत्तार पटेल, बाजीराव पाटील, सतिष पाटील, किषोर साखरे, कपील बोंद्रे, बाळु साळोख, किषोर सोळंकी, भाई प्रदिप अंभोरे, रामभाउ जाधव, मदनराव म्हस्के, गजानन ठेंग, बाळु तायडे, रवि तोडकर, प्रमोद पाटील, भारत म्हस्के, अनिल फेफाळे, संजय गिरी, निलेष देठे, विजय जागृत, दिलीप चवरे, गजानन वायाळ, गजानन परिहार यांच्यासह सुतगिरणीचे भागधारक, संचालक, विश्वस्त , विविध सेलचे पदाधिकारी, तथा परीसरातील सरपंच, उपसरपंच, माजी माजी नगरसेवक, जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, बाजार समितीचे संचालक, प्रशासक, व मोठया संख्येने महिलांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्तावीक प्रकाश निकाळजे तर सुत्रसंचलन माजी सभापती जगन्नाथ पाटील, आयोजकाच्य वतीने आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी प्रमाणपत्र, भेटवस्तु व पुष्पगुच्छ देवुन सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला तर भागधारकांना भेट वस्तु देवून सन्मानीत करण्यात आले.