मानसिक व शारीरीक स्वास्थ्य निरोगी ठेवण्यासाठी ‘‘झुंबा’’ अत्यंत उपयोगी आहे - अॅड.सौ. वृषालीताई बोंद्रे* हिरकणी प्रतिष्ठाणच्या ‘झुंबा’ फिटनेस शिबीराचा समारोप

मानसिक व शारीरीक स्वास्थ्य निरोगी ठेवण्यासाठी ‘‘झुंबा’’ अत्यंत उपयोगी आहे - अॅड.सौ. वृषालीताई बोंद्रे
* हिरकणी प्रतिष्ठाणच्या ‘झुंबा’ फिटनेस शिबीराचा समारोप 
 
चिखली : (एशिया मंच वृत्त)
     झुंबा हा एक डान्स प्रकार असुन त्याची आवड निर्माण झाल्यास दैनदीन जिवनात शरीर प्रकृती सृदृढ होवुन आरोग्य विषयांच्या अनेक समस्या दुर होतील, नियमीत झुंबाच सराव केल्याने मानसिक व शारीरीक स्वास्थ्य निरोगी राहते, शरीरात लवचिकता येते. झुंबा मध्ये बेलीडान्स, साल्सा, हिप-हाॅपसारख्या विविध नृत्य शैलींचा समावेष आहे. यात तालबध्द, लयबध्द शारीरीक हालचाली केल्या जातात. या गतीमान हालचालींमुळे शरीरातील स्नायुमधील रक्ताभिसरन सुधारते, स्नायु मजबुत होतात यामुळे या झुंबा फिटनेस डाॅन्सचा दैनदीन जिवनात अबाल ते वृध्दांपर्यत लाभदायक ठरत असल्याचे प्रतिपादन हिरकणी महिला प्रतिष्ठाणच्या संस्थापक अध्यक्षा अॅड.सोै. वृषालीताई बोंद्रे यांनी केले.
        चिखली येथील हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाण तथा फिटनेस झोन च्या संयुक्त विद्यमाने चिखली येथे दि. 17 ते 22 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवशिय झुंबा व बेसिक डाॅन्स या योग फिटनेस शिबीराचा दि. 22 डिसेंबर रोजी समारोप करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानवरून अॅड.सोै. वृषालीताई बोलतांना पुढे म्हणाल्या की, 90 च्या दशकात एका कोलंबीयन नृत्यदिग्दर्शक अल्बर्टो ‘‘बेटो’’ पेरेझ यांनी तयार केलेला आणी सन 2001 मध्ये स्थापीत केलेला आंतरराष्ट्रीय ब्रांडेड फिटनेस कार्यक्रम आहे. झुंबा हा डान्स जगातील सर्वात मोठा फिटनेस तथा नृत्य प्रकार आहे. भारतातील पारंपारीक नृत्य प्रकारा नंतर हळुहळु वेगवेगळे डान्सचे प्रकार उदयास येवू लागले. फिटनेस म्हणजे उत्तम आरोग्याची कल्पना हळुहळु आपल्या देशात पसरू लागली आहे. झुंबामुळे वाढते वजन, सुटलेले पोट व विविध समस्या दुर होतात, यात संगिताच्या तालावर वेगवेगळया स्टेप्स् करून आपले वजन घटविता येते. झुंबा शिकण्याकरीता वयाचे बंधन नसुन गाण्याच्या तालावर थिरकतांना सुमारे 800 कॅलरीज बर्न करू शकता. लाॅकडाउंच्या काळात हिरकणी महिला प्रतिष्ठाणच्या माध्यमातुन अनेक कार्यक्रम आॅनलाईन पध्दतीने आले होते मात्र आता नियम शिथील झाल्याने झुंबा प्रशिक्षण हे आॅफलाईन पध्दतीने घेतल्या गेल्याने महिला व तरूणींनी मोठया संख्येने या शिबीराचा लाभ घेतला असुन त्यांचा त्यांना प्रचंड फायदा झाल्याच्याही प्रशिक्षणार्थींच्या समाधान कारक प्रतिक्रीया उमटत आहेत, असे यावेळी सांगितले. 
          सदर शिबीरामध्ये 100 हून अधिक महिला व तरूणींनी सहभाग नोंदविला समारेाप प्रसंगी प्रतिष्ठाणच्या सदस्या ज्येातीताई बियाणी, भारतीताई बोंद्रे, गिताताई भोजवानी, छायाताई काच्छवाल, प्रितिताई महाजन तर झुंबा फिटनेस झोनचे संचालक उमेश गुजर तथा तज्ञ प्रषिक्षक प्रिती वाघमारे यांची उपस्थितीत होती.