* ॲपेत विसरलेले अडीच हजार व मोबाईल महिला प्रवाशाला दिले परत
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
तालुक्यातील देऊळघाट येथील अॅपे रिक्षा चालक हफिज खान अज़िज़ खान वय २८ वर्ष याचे प्रमाणिकपणाची चर्चा होत आहे.
२५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हफीज़ खान याच्या बुलडाणा येथुन चिखलीकडे जाणाऱ्या अॅपमध्ये सरला अविनाश भाकडकर रा. शिरपूर आपले वडिलासह बसल्या व केळवदला उतरल्या. रिक्षा चालक पुढे चिखलीकडे निघून गेला परंतु चिखली पोहचल्यावर रिक्शाचालक हफीज़ खान याला ॲपे मध्ये एक पर्स दिसून आली. त्यामध्ये नगदी अडीच हजार रुपये व एंड्रॉइड मोबाईल होता.
चालक हफीज़ खानच्या मनात कुठलाही मोह न बाळगता त्यांनी प्रमाणिकपणा दाखवत, चिखली पोलीस स्टेशन गाठले व पर्स ठाणे अमलदाराकडे सुपुर्द केले. त्याचवेळी सदर महिलेचा त्या मोबाईल वर कॉल आल्यावर त्यांना पोलीस स्टेशनला बोलावून नगदी रक्कम व मोबाइल परत करण्यात आले आहे.