जनरल रावत व सैन्य दलातील अधिकाऱ्याच्या जाण्याने देशाची अकाळी हानी - अॅड. सौ.वृषालीताई बोंद्रे * दिवंगत जनरल रावत व सैन्य अधिकाऱ्यांना चिखलीत माजी सैनिकांनी अर्पण केली श्रध्दांजली

जनरल रावत व सैन्य दलातील अधिकाऱ्याच्या जाण्याने देशाची अकाळी हानी - अॅड. सौ.वृषालीताई बोंद्रे 
* दिवंगत जनरल रावत व सैन्य अधिकाऱ्यांना चिखलीत माजी सैनिकांनी अर्पण केली श्रध्दांजली
 

चिखली : (एशिया मंच वृत्त)
    भारतीय सैन दलाचे प्रमुख जनरल स्व. बीपीन रावत यांच्या व त्यांच्या सहकाऱ्याच्या अपघाती निधनामुळे भारतीय सैन दलाबरोबरच देशाची प्रचंड हाणी झाली असुन न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. दिवंगत जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी स्व. मधुलीका यांच्यासह अन्य 11 सैन्य अधिकारी कर्मचाऱ्यांचा या हेलीकाॅप्टर अपघातात दुखःद निधन झाले. या अपघातात मुत्यूमूखी पडलेल्या भारतीय सैन्य दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना चिखली मतदार संघातील माजी सैनिकांच्या वतीने स्थानिक जयस्तंभ चैकातील अशोक वाटीकेत सामुहिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी हिरकणी महिला प्रतिष्ठाणच्या संस्थापक अध्यक्षा अॅड.सौ. वृषालीताई बोंद्रे यांनी अपघातात मुत्यूमुखी पडलेल्या सैन्य अधिकारी यांच्यासह जनरल स्व.बिपीन रावत यांच्या निधनावर दुखः व्यक्त करीत त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली असुन देशाला त्यांची उणीव प्रकर्षाने जानवेल आशा स्वरूपात आपल्या शोक संवेदना व्यक्त करीत पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली वाहली.
     स्थानिक जयस्तंभ चैकातील अशोक वाटीकेत दिनांक 10 डिसेंबर रोजी चिखली तालुक्यातील माजी सैनिकांच्या वतीने सामुहिक श्रध्दांजलीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या संस्थापक अध्यक्षा अॅड.सौ. वृषालीताई बोंद्रे, ठाणेदार अशोकराव लांडे, कुणाल बोंद्रे, नगरसवेक दिपक खरात, गोपाल देव्हडे, सचिन बोंद्रे, सैनिक फेडरेशनच्या जिल्हा अध्यक्षा श्रीमती प्रमीलाताई जाधव, माजी सैनिक मनोहर डुकरे, श्रीकृष्ण बंगाळे, पांडुरंग म्हस्के, पत्रकार नितीन गुंजाळकर, राजु बोडखे, कुंडलीक जाधव, सुरेश मोरे, विद्याताई देशमाने, राजेश्वर  अवचार, दिलीप शेळके, अनिल सवडे, विनोद डोंगरे, आत्माराम सुरडकर, हेमंत कुलकर्णी, अंबादास डुकरे, दादाराव गवई, त्र्यंबक वाकडे, प्रषांत भटकर, उध्दव इंगळे, कुसूम जाधव, उध्दव गाडेकर, जिजाबाई जाधव, विलास जाधव,  सुरेश मोरे, विनोद पवार, श्याम पवार, स्वप्नील खरात, स्वप्नील सोळंकी यांच्यासह तालुक्यातुन आलेल्या माजी सैनिक, महिला, व नागरीकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.