राष्ट्रीय लोक अदालतमध्ये ९२२५ प्रकरणे निकाली ; ९.५० लक्ष शुल्क वसूल

राष्ट्रीय लोक अदालतमध्ये ९२२५ प्रकरणे निकाली ; ९.५० लक्ष शुल्क वसूल
बुलडाणा  : (एशिया मंच वृत्त)
        महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलडाणा तथा वकील संघ बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ११ डिसेंबर रोजी जिल्ह्यतील सर्व न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालत ने आयोजन करण्यात आले होते. जिल्हयात राष्ट्रीय लोक अदालत मध्ये बॅक व ग्रामपंचायत यांची दाखलपूर्व प्रकरणे २५ हजार ४६२ दाखल झाले होते. त्यापैकी ८४९८ प्रकरणे निकाली निघाली असून रूपये २ कोटी २४ लक्ष ६९ हजार ११४ रुपये तडजोड शुल्क वसुल करण्यात आले. तसेच न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे ५७६४ ठेवण्यात आले असून त्यापैकी ८३७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये एकूण ७ कोटी २५ लक्ष ७२ हजार ३०० रुपये तडजोड शुल्क वसुल करण्यात आले. असे एकुण बुलडाणा जिल्हयात ४१ हजार २२६ प्रकरणे ठेवण्यात आलीत. यामध्ये एकूण ९ हजार २२५ प्रकरणे निकाली काढण्यात आलीत. या प्रकरणांमधून रुपये ९ कोटी ५० लक्ष ४१ हजार ४१४ रुपये तडजोड शुल्क व दंड म्हणून वसूल करण्यात आला.
     ही लोक अदालत अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील  खटी, जिल्हा न्यायाधीश १आर.एन. मेहरे, जिल्हा न्यायाधीश-२ आर.बी. देशपांडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव साजीद आरीफ सैय्यद, सह दिवाणी न्यायाधिश व.स्वर श्रीमती एस.एम पडोळीकर , दुसरे सह दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर ए.यु.सुनेकर, दिवाणी न्यायाधीश क.स्तर ए. ए देशपांडे, २ रे दिवाणी न्यायाधीश क.स्तर एन श्री. चव्हाण, ३रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर ए.बी.इंगोले आणि ४ थे सहदिवाणी न्यायाधिश क.स्तर डब्ल्यू.डी.जाधव, कामगार न्यायालयाचे न्यायाधिश अ.गो मगरे यांच्या मार्गदर्शनात तर जिल्हा वकील संघाचे सचिव अँड. अमर इंगळे, अॅड. राहूल दाभाडे, अॅड.विक्रांत मारोडकर, अॅड. संदिप टेकाडे, अॅड. धिरजकूमार गोठी, अॅड.संदीप एन पांचाळ, अॅड.एस.सी भालेराव, अॅड.अमोल जि देशमुख, अॅड सविता चांदोरे, ॲड रत्नमाला गवई, अल्पेश ठाकरे, अॅड.जे एरा गवई, अॅड. सारीका भोलाने, अॅड.एन पी सवडतकर, अॅड आर.एम काशीकर, ॲड ए एस झीने तसेच सौ.जयश्री शिंदे समाजसेवीका, विनोद जाधव समाजसेवक यांनी सहाय्यक पंच म्हणून काम पाहिले. तसेच बुलडाणा जिल्हा वकील संघाचे सर्व विधिज्ञांनी राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्याकरीता आपले योगदान दिले.
   राष्ट्रीय लोक अदालत चे यशस्वीरित्या आयोजन पार पाडण्यासाठी बुलडाणा जिल्हयाचे सर्व वकील संघाचे विधीज्ञ, बँकांचे अधिकारी व कर्मचारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे कर्मचारी, अधीक्षक एस.डी.वाउ , वरिष्ठ लिपिक एस एस महाजन, लिपिक हेमंत आ देशमुख, जी.पो. मानमोडे, ए.बी. अवचार, ए.ए.लहाने, की.एस मिलके, प्रविण खर्चे, बुलडाणा न्यायालयाने कर्मचारी यांनी प्रयत्न केले. हया लोकअदालतीमध्ये सर्वांनी कोवीड-१९ च्या नियमांचे पालन करत मास्क लावुन, सामाजीक दुरी ठेवुन व इतर सर्व काळजी घेवुन जास्तीत जास्त प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.