सिंदखेड राजा : (एशिया मंच वृत्त : मंगेश राजगुरु)
वडिलोपार्जित शेती विकण्यास विरोध केला म्हणून पतीने पत्नीच्या साखर झोपेत असतानाच वाटण्याचा पाटा डोक्यात टाकून खून केल्याची घटना 11 डिसेंबर रोजी सकाळी 4 चे सुमारास सिंदखेड राजा तालुक्यातील साखर खर्डा येथील स्थानिक भीमनगर येथे घडली.
सदर घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, भीमनगर येथे राहणाऱ्या संजय पांडुरंग गवई याचे सोबत अंत्रीखेडेकर येथील मधुकर सरकटे यांची व्दितीय कन्या सुनिता उर्फ गोदावरी हिचे सोबत 19 वर्षापूर्वी थाटामाटात संपन्न झाला. लग्नानंतर आरोपी संजय हा किरकोळ कारणावरून सुनिता हिचा छळ करायचा. गेल्या काही दिवसांपासून सुनिता ही माहेरी गेली होती काल माहेरहून परत आल्यावर शेती विकण्याचा तकादा लावला मात्र 1 मुलगी, 2 मुले असल्याने शेती विकण्यास सुनिताने विरोध केला. हा राग अनावर झाल्याने सुनिता ही झोपेत असताना संजय गवई यांनी वाटण्याचा पाटा डोक्यात टाकून क्रुरपणे हत्या केली. घटनेनंतर आरोपी संजय हा पोलीस ठाण्यात हजर होवून केलेल्या कृत्याची कबूली दिल्यावर मृतक सुनिता चा भाऊ समाधान सरकटे याच्या तक्रारीवरून ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी घटनास्थळी पंचनामा करून आरोपी संजय गवई यास अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेने गावात खळबळ उडाली.
