बुलडाणा बसस्थानक परिसरात गोपीनाथराव मुंढे यांना अभिवादन

बुलडाणा बसस्थानक परिसरात गोपीनाथराव मुंढे यांना अभिवादन
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       येथील बसस्थानक परिसरामध्ये वंजारी समाज बांधव तसेच इतर समाज बांधवांच्या वतीने १२ डिसेंबर रोजी जयंती निमित्त लोकनेते गोपीनाथराव मुंढे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. अभिवादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर वाघ, देवराव खार्डे यांची उपस्थिती होती.
      अभिवादन कार्यक्रमाच्या सुरुवातीस राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या प्रतिमेला देवराव खार्डे यांच्याहस्ते पुष्पहार करण्यात आला. तर लोकनेते गोपीनाथ मुंढे यांच्या प्रतिमेला ज्ञानेश्वर वाघ यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. अभिवादन कार्यक्रमाला शहरातील दिपकराव वारे, बद्रीनाथ जायभाये, ज्ञानेश्वर कापसे, सतिश वारे, अॅड.पराग वाघ, डॉ.गणेश गरकळ, अनिल वारे, देवानंद ताठे, अजीत पालवे, शरद नागरे, प्रविण थोरात, पुरुषोत्तम चाटे, दत्ता ढाकणे, गणेश मांटे, अनिल वाघ, देविदास डोईफोडे, नामदेव शेळके, संतोष अक्कर व बुलडाणा शहरातील वंजारी समाज बांधवांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वैभव बद्री मुंढे यांनी परिश्रम घेतले.