पिकविम्या संदर्भातील असंख्य तक्रारी ...* आश्वासनाची पुरतात न झाल्यास स्वाभिमानी छेडणार कारखेड शेतकऱ्यासह आंदोलन – अमोल मोरे

पिकविम्या संदर्भातील असंख्य तक्रारी ...
* आश्वासनाची पुरतात न झाल्यास स्वाभिमानी छेडणार     कारखेड शेतकऱ्यासह आंदोलन – अमोल मोरे
चिखली : (एशिया मंच वृत्त)
      तालुक्यातील कारखेड येथील बऱ्याच शेतकऱ्यांनी पिकविमा काढला होता. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर स्वभिमानीचे राज्याचे नेते रविकांत तुपकर साहेबांच्या पाठपुराव्यानंतर विमा रक्कम जमा झाली आहे. परंतु काहींना तुटपुंजी तर काहींना काहीच मदत जमा झाली नाही. कारखेड येथील शेतकरी आज जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. नरेंद्र नाईक साहेब यांची भेट घेऊन या शेतकऱ्यांची अडचणी लक्षात आणून दिल्या व अर्जाची एक प्रत कृषी विभाग व रिलायन्स पिक विमा जिल्हा व्यवस्थापक शर्मन कोडीयात्तर यांच्याकडे सादर केल्या आहेत. नाईक  साहेब यांनी ह्या समस्या लवकर मार्गी लावू असे आश्वासन दिले आहे. या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास स्वभिमानीच्या वतीने शेतकऱ्यासमवेत आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी अमोल मोरे यांनी दिला. यावेळी अमोल मोरे, महेंद्र जाधव, स्वभिमानीचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी व कारखेड येथील असंख्य शेतकरी उपस्थित होते.