वीज वितरण कार्यालयात कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षात भाजपचे ठिय्या आंदोलन* कृषीपंपाचे वीज कनेक्शन जोडण्याचे पुन्हा एकदा आश्वासन

वीज वितरण कार्यालयात कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षात भाजपचे ठिय्या आंदोलन
* कृषीपंपाचे वीज कनेक्शन जोडण्याचे पुन्हा एकदा आश्वासन
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
     तीन दिवसांत शेतकर्‍यांची तोडलेली वीज जोडून देऊ आणि पुन्हा वीज कनेक्शन तोडणार नाही असे लेखी देऊनही महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनीही शब्द फिरवला. त्यामुळे आक्रमक झालेल्या चिखलीच्या आ.श्वेताताई महाले यांनी 3 डिसेेंबरला दुपारी महावितरणचे बुलडाणा येथील चिखली रोडवरील कार्यालय गाठले. कार्यकारी अभियंता बद्रीनाथ जायभाये यांच्या दालनात त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यत वीज जोडली केली जात नाही तोपर्यत इथून उठणार नाही असा इशारा त्यांनी दिला. कार्यालयातच कार्यकर्त्यानी जोरदार घोषणाबाजी करून कार्यालय परिसर दणाणून सोडला.
      जोपर्यत शेतकर्‍यांची वीज जोडत नाही तोपर्यत आ. महाले यांनी शेतकर्‍यांसह ठाण मांडून होत्या. शहर पोलिसासह दंगा काबू पथक अतिरिक्त पोलिस दलही पाचारण करण्यात आले त्यामुळे तणाव निर्माण झाला होता.उद्या दि. 4 डिसेंबर रोजी वीज कनेक्शन जोडण्याचे लेखी आश्वासन पुर्ण न केल्यास आंदोलन सुरू राहणार असून येत्या हिवाळी अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव मांडणार असल्याचे आ. श्वेताताई महाले यांनी सांगितले.
       कृषी पंपाची तोडलेली वीज जोडणी तातडीने करावी या मागणीसाठी 29 रोजी आ.महाले यांच्या आक्रमक नेतृत्वाखाली चिखली येथिल खामगाव चौफुली येथे चार तास रास्ता रोको आंदोलन कार्यकारी अभियंता विज वितरण कंपनी यांनी तीन दिवसांत वीज जोडणी करून देऊ आणि आता पुन्हा वीज कनेक्शन तोडणार नाही असे लेखी आश्वासन दिल्याने थांबविण्यात आले. परंतु लेखी आश्वासन न पाळल्याने स्वतः वीज जोडणी करण्याची घोषणा आ. महाले यांनी केली होती. आज दि. 3 डिसेंबर रोजी दुपारी ठिय्या आंदोलन दरम्यान सायंकाळी 5 वाजता कार्यकारी अभियंता जायभाये व आडवे यांनी उद्या दि. 4 डिसेंबर रोजी विद्युत कनेक्शन जोडण्यासाठी चिखली मतदार संघातील सर्व उपअभियंत्यांना वीज कनेक्शन जोडण्यात येतील असे आश्वासन दिले. या आश्वासनावर आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यानी लगेच निवेदन दिले. दि. 3 डिसेंबर रोजी लेखी आश्वासनानुसार दि. 4 डिसेंबर पर्यत वीज जोडणी न झाल्यास शेतकरी आपल्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करतील शेतातील उभारण्यात आलेल्या विज रोहित्र व विद्युत खांब त्वरित काढून येण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात आ. श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वात तालुकाध्यक्ष सुनिल देशमुख, सरचिटणीस डॉ. राजेश्वर उबरहंडे, देवीदास जाधव, अ‍ॅड. मोहन पवार, संदिप उगले, चिखली शहराध्यक्ष पंडीतराव देशमुख, कृष्णकुमार सपकाळ, विरेंद्र वानखेडे , नगरसेवक अरविंद होंडे, मंदार बाहेकर, पद्मानाभ बाहेकर, सतिष पाटील, अरूण भोंडे, ज्ञानेश्वर सुसर, समाधान शेळके, भुजगरांव शेळके, जयेश पडोळ, कुलदिप पवार, शैलेश तरमळे, सोपान जगताप, शंकर तरमळे, सुभाष जगताप, अमर शेळके, सतिष शेळके यासह शिरपूर, डोमरूळ, दहिद म्हसला, पिंपळगांवसराई, रायपूर, यासह संपुर्ण तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले होते.