बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
स्थानिक सहकार विद्या मंदिर अॅन्ड ज्यु. कॉलेज व मोशन क्लासेस, कोटा यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या सहकार मोशन क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी अभुतपुर्व यशासह NEET परिक्षेत यश मिळविले आहे. त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. NEET परिक्षेमध्ये अत्यंत उत्कृष्ट गुणांसह यशस्वी विद्यार्थ्याचे बुलडाणा अर्बनचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. सुकेशजी झंवर यांच्या हस्ते रोख पारीतोषीक देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य अलागरसामी व्यासपिठावर उपस्थित होते. तर मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावर्षी 720 पैकी 619 गुण मिळवित चि. प्रणव चौधरी याने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. त्याला डॉ. झंवर सर यांच्याहस्ते रु.55,000/- रोख पारितोषीक देवून गौरवांकित करण्यात आले. तर 618 गुणांसह द्वितीय मानांकित यशस्वी विद्यार्थी चि. दर्पण मुथा याला देखील रु.55,000/- रोख पारितोषीक देवून गौरवांकित करण्यात आले. तर कु. साक्षी चोपडे हिने 602 गुणांसहित तिसरा क्रमांकाचे गुण प्राप्त केले तर 590 गुणांसहित कु. अस्मिता वानखेडे हिने चौथा क्रमांक प्राप्त केला. सदर विद्यार्थ्यांना प्रत्येक रु.51,000/- रोख पारितोषीक देवून सम्मानित करण्यात आले.
डॉ. सुकेशजी झंवर यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. मेहनत व सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास यश तुम्ही मिळवालच असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. जिवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परीश्रम आवश्यक असतात तसेच विषयांना समजुन अभ्यास करण्याचा फायदा आपणांस मिळतो असा विचार त्यांनी विद्यार्थ्यासमोर मांडला.
याप्रसंगी चि. प्रणव व चि दर्पण यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी सातत्यपुर्ण अभ्यासावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. तसेच परीक्षेचा तणाव न घेता अभ्यास करावा असा विचार त्यांनी विद्यार्थ्यांसमोर ठेवला. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय सहकार मोशन क्लासेसच्या सर्व शिक्षकांना दिले. तर सहकार विद्या मंदिर व्यवस्थापनाने वेळोवेळी उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे अभ्यासात फायदाच झाला असे मत व्यक्त करीत बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक, संस्थेच्या अध्यक्षा सौ. कोमलताई सुकेशजी झंवर, संस्थेचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. सुकेशजी झंवर यांचे आभार मानले.
