राज्य कर विभागात निलेश जैन यांची सहायक आयुक्त म्हणून पदोन्नती !

राज्य कर विभागात निलेश जैन यांची सहायक आयुक्त म्हणून पदोन्नती !
बुलडाणा : (एशिया मंच न्यूज )
         येथील मूळचे रहिवासी निलेश नामदेवराव जैन यांची राज्य कर विभागात सहायक आयुक्त (वर्ग १) म्हणून पदोन्नती झाली आहे. 
नीलेश जैन हे मूळचे बुलडाणा येथील असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांचे माध्यमिक शिक्षण एडेड हायस्कूल येथे झाले. वडिलांच्या अकाली निधनानंतर त्यांनी प्रगती सार्वजनिक वाचनालयात ग्रंथपाल पदापासून काम करीत सुरुवातीला मंत्रालयात लिपिक पदावर, त्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विक्रीकर अधिकारी बनले. मुंबईत माझंगाव येथे ते कार्यरत होते. त्यांची नुकतीच राज्य कर सहाय्यक आयुक्त वर्ग एक म्हणून पदोन्नती झाली आहे. मुंबईतीलच बेलापूर येथे त्यांची पदोन्नतीने पदस्थापना झाली आहे. 
         बुलडाणा जिल्हा परिषदेतील विस्तार अधिकारी उमेश जैन व  पत्रकार अरुण जैन यांचे ते लहान बंधू होत. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.